VIDEO : कपड्यांचा दुकानदार इतका का नाचतोय? पण भारी नाचतोय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

तुम्ही जर मोबाईल वापरत असाल किंवा त्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच बघितला असेल (shopkeeper dance after lockdown open viral video)

VIDEO : कपड्यांचा दुकानदार इतका का नाचतोय? पण भारी नाचतोय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


मुंबई : तुम्ही जर मोबाईल वापरत असाल किंवा त्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच बघितला असेल. सोशल मीडियावर हजारो-लाखो मनोरंजनात्मक व्हिडीओ समोर येत असतात. त्यातील एक देशी मनोरंजनात्मक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भाव खावून जातोय. हा व्हिडीओ प्रत्येकाला हसवतोय. विशेष म्हणजे तुम्ही स्वभावाने कितीही गंभीर राहा. पण हा व्हिडीओ बघितला तर तुमच्यावर आपणहून हास्य येईल. या व्हिडीओत तशी खास बात आहेच. आणि ती खास बात म्हणजे व्हिडीओ नृत्य करणारा साड्यांचा व्यवसाय करणारा कपड्यांचा दुकानदार (shopkeeper dance after lockdown open viral video).

हजारो लोकांकडून डान्सचं कौतुक

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक कपड्यांचा दुकानदार ‘रंगीलो म्हारो ढोलणा’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो कपड्यांच्या दुाकानात डान्स करतोय. व्हिडीओत ते स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या बॅकग्राऊंडला साड्या ठेवलेल्या दिसत आहेत. तसेच त्याचे इतर सहकारीदेखील त्याचा डान्स बघत इन्जॉय करत आहेत. डान्स करणारा दुकानदार नेमका कोण आहे? ते अद्याप तरी समोर आलेलं नाही. पण त्याचा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितलाय. तसेच हजारो लोकांनी त्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

व्हिडीओ नेमका आला कुठून?

संबंधित व्हिडीओ फेसबुकवर ‘Bhaiya hum Kanpuriya hain’ या नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 9 लाखापेक्षाही जास्त लोकांनी बघितला. तसेच 25 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. गाणं जितकं उत्साहाचं वाटतं तितक्याच उत्साहात दुकानदार डान्स करत असल्याने तो व्हिडीओ अतिशय मनोरंजनात्मक वाटतोय (shopkeeper dance after lockdown open viral video).

व्हिडीओत दुकानदार का नाचतोय?

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडीओतील दुकानदार नाचतोय नेमका का? तर संबंधित व्हिडीओला जे कॅप्शन देण्यात आलंय त्यानुसार लॉकडाऊन उघडल्याच्या आनंदात दुकानदार नाचत असल्याचा दावा करण्यात आला आहे. लॉकडाऊन उघडल्यामुळे कपड्यांचं दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच आनंदात दुकानदार नाचत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

लॉकडाऊन उघडल्याने व्यापाऱ्यांना दिलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे जवळपास दोन ते तीन महिने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. अखेर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे कपडे आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुकानदाराचा नाचण्याचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातमी : Viral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल