भारताचा हिटमॅन रोहित शर्मा रावळपिंडत कसा? रोहितच्या डुप्लिकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

सध्या पाकिस्तानच्या रावळपिंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. ज्याचा चेहरा हुबेहुब रोहित शर्मासारखा आहे.

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा रावळपिंडत कसा? रोहितच्या डुप्लिकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
सध्या पाकिस्तानच्या रावळपिंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. ज्याचा चेहरा हुबेहुब रोहित शर्मासारखा आहे.
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 1:56 PM

भारताचा हिटमन रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. याचे कारण त्याची कामगिरी नाही तर पाकिस्तान आहे. सध्या पाकिस्तानच्या रावळपिंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. ज्याचा चेहरा हुबेहुब रोहित शर्मासारखा आहे. ( Photo of a man who looks like Indian cricketer Hitman Rohit Sharma goes viral in Rawalpindi, Pakistan)

हा फोटो ट्विट करताना शिराज हसन नावाच्या स्थानिक पत्रकाराने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी असुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्यांची खिल्ली उडवली. हसन म्हणाला की, त्याने भारताचा उपकर्णधार रावळपिंडी बाजारात पाहिला असल्याचं म्हटलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी मीम्स बनवण्यासह कमेंट्स करण्यास सुरुवात केली.

हा फोटो पाहा:

 

हा फोटो करताना शिराज हसनने लिहिले, ‘कोण म्हणतो की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या दौऱ्यासाठी सुरक्षित नाही? आत्ताच, भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा रावळपिंडीच्या सदरमध्ये आलू बुखाराचा आनंद घेताना दिसला.

या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, ‘हा कमी बजेटचा हिटमन आहे. ‘दुसऱ्याने लिहिले,’ मुंबई इंडियन्स सध्या हारत आहे, त्यामुळेच रोहित शर्मा ताकद मिळवण्यासाठी हा शरबत पित आहे. ‘अजून एकाने लिहलं की,’ आयला! हा तोच आहे.

हेही वाचा:

नवज्योतसिंह सिद्धूचा राजीनामा, अर्चना पुरण सिंह ट्रेंड, द कपिल शर्मा शो मधील खुर्ची धोक्यात असल्याचे फनी मिम्स

पुन्हा एकदा चर्चेत आली रानू मंडल, तिच्याच शैलीत गायलं ‘Manike Mage Hithe’ गाणं – पाहा व्हिडीओ