नवज्योतसिंह सिद्धूचा राजीनामा, अर्चना पुरण सिंह ट्रेंड, द कपिल शर्मा शो मधील खुर्ची धोक्यात असल्याचे फनी मिम्स

एकीकडे सिद्धू राजकीय वर्तुळात ट्रेंड करत होते. त्यासोबतच अर्चना पूरन सिंगही आता ट्रेंड करण्यास सुरुवात झाली आहे.

नवज्योतसिंह सिद्धूचा राजीनामा, अर्चना पुरण सिंह ट्रेंड, द कपिल शर्मा शो मधील खुर्ची धोक्यात असल्याचे फनी मिम्स
कपिल शर्मा शो मधील अर्चना यांची खुर्ची धोक्यात आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

नवजोतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. सिद्धूच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुर्चीवर बसलेल्या अर्चना पूरन सिंह देखील लोकांमध्ये चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बरीच चर्चा आहे आणि अनेक मजेदार मीम्स देखील शेअर केले जात आहेत. ( archana-puran-singh-trend-on-social-media-after-navjot-sidhu-quits-as-punjab-congress-chief the kapil Sharma Show )

एकीकडे सिद्धू राजकीय वर्तुळात ट्रेंड करत होते. त्यासोबतच अर्चना पूरन सिंगही आता ट्रेंड करण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्ही म्हणाल, अर्चना पुरण सिंह यांचा काय संबंध. तर संबंध आहे कपिल शर्मा शोचा. या शोमध्ये आधी नवज्योतसिंह सिद्धू जजच्या खुर्चीवर बसत होते, मात्र, काँग्रेसमध्ये जबाबदारी वाढल्यानंतर त्यांनी हा शो सोडला आणि ती जागा अर्चना पुरण सिंह यांना मिळाली. यावरुन, कपिल आपल्या अनेक एपिसोडमध्ये अर्चना पुरण सिंह यांच्यावर अनेक विनोद करत असतो. सिद्धूंनाही हटवून अर्चना पुरण सिंह यांनी ही खुर्ची कशी मिळवली, असा प्रश्न तो शोमध्ये नेहमी विचारतो. त्यावरुनच आता नेटकरी अर्चना पुरण सिंह यांना ट्रोल करत आहेत. सध्या #अर्चनापुराणसिंह हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. कारण, सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, कपिल शर्मा शो मधील अर्चना यांची खुर्ची धोक्यात आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हेच नाही तर अर्चना पुरण सिंह यांनीही हे मिम्स शेअर केले आहेत, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या मिम्समध्ये तुम्ही पाहु शकता की, ‘ अर्चना बुरख्यामध्ये रडत आहे आणि मला घरी जायचे आहे’ असं म्हणताना दिसत आहे. हे शेअर करताना अर्चनाने लिहिलं आहे की, “मी माझे स्वतःचे मिम्स बनवत आहे … किस्सा कुर्सी का .. “यासह अर्चनाने हसणारे इमोजी शेअर केले आहे.

अर्चना पुरण सिंह यांची पोस्ट:

अर्चना पुरण सिंह यांच्यावरील मिम्स:

 

 

 

तुमच्या माहितीसाठी, अर्चना पुरण सिंह यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रियाही दिली आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या कित्येक वर्षांपासून या विषयावर विनोद केले जात आहे, ‘पण कमी कधीही या गोष्टीची काळजी केली नाही, ना कधी या गोष्टींना गांभीर्याने घेतलं. जर सिद्धू या शोमध्ये परत येऊ इच्छित असतील, आणि माझी जागा घेऊ इच्छित असतील तर ते परत येऊ शकतात. माझ्याकडे अजून खूप कामं आहेत, जे मी गेल्या कित्येक वर्षांपासून टाळत आली आहे.’

हेही वाचा:

Tiger Shroff : माउथ फ्रेशनरच्या जाहिरातीमुळे टायगर श्रॉफ ट्रोल, चाहत्यांनी घेतलं तोंडसुख

Video: अजून एका डान्सिंग अंकलचे ठुमके सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून सगळं टेन्शन विसरलो!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI