Video: अजून एका डान्सिंग अंकलचे ठुमके सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून सगळं टेन्शन विसरलो!

व्यक्तीचा लग्नात नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्यक्ती लग्नात बॉलिवूड गाण्यावर जोरदार ठुमके लावताना दिसत आहे.

Video: अजून एका डान्सिंग अंकलचे ठुमके सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून सगळं टेन्शन विसरलो!
व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती इतका मनमुराद नाचतो, की वऱ्हाडी त्याला चेअरअप करायला लागतात.

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यात नाच-गाण्याचे व्हिडीओ तर लोकांना पाहायला खूप आवडतात. असे व्हिडीओ लगेच व्हायरल होतात. सध्या असाच एका व्यक्तीचा लग्नात नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्यक्ती लग्नात बॉलिवूड गाण्यावर जोरदार ठुमके लावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती इतका मनमुराद नाचतो, की वऱ्हाडी त्याला चेअरअप करायला लागतात. ( man dance in wedding to famous song kothe upar kothri video goes viral internet dancing uncle )

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोठे ऊपर कोठरी या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तो संजय दत्त आणि जेबा बख्तियार यांच्या जय विक्रांत या चित्रपटातील एका गाण्यावर नाचतो. त्यानंतर तो आणखी खुलतो आणि जोर जोरात ठुमके लावण्यास सुरुवात करतो. हेच नाही तर आपल्या एका मित्रालाही तो नाचण्यासाठी बोलावतो. डान्सिंग अंकलचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याच पद्धतीचा हा व्हिडीओ आहे.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by MEMES.BKS(10k🎯) (@memes.bks)

यानंतर हे दोघे मित्र गाण्यावर मनमुराद नाचताना दिसतात. वऱ्हाडी मंडळीही या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. ते शिट्टी वाजवून आणि टाळ्या वाजवून या दोघांनाही चिअरअप करतात. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर यावर भरभरुन प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झाली. लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एका लिहलं, असा डान्स पाहून सगळा तणाव दूर झाला. तर एकाने या व्यक्तींच्या ठुमक्यांची तारीफ केली.

memes.bks ने हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला. ज्यावर आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. हेच कारण आहे की आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI