Tiger Shroff : माउथ फ्रेशनरच्या जाहिरातीमुळे टायगर श्रॉफ ट्रोल, चाहत्यांनी घेतलं तोंडसुख

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 11:08 AM

एक प्रसिद्ध माउथ फ्रेशनर जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यात महेश आणि टायगरची झलक दिसली होती. हे पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. 1 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चाहत्यांना उत्तर आणि दक्षिणचे दोन प्रसिद्ध सुपरस्टार एकत्र पाहण्यात खूप मजा आली. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. (Tiger Shroff is being trolled for Mouth Freshener ad, see fan's reaction)

Tiger Shroff : माउथ फ्रेशनरच्या जाहिरातीमुळे टायगर श्रॉफ ट्रोल, चाहत्यांनी घेतलं तोंडसुख

मुंबई : टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अॅक्शनपासून ते डान्सपर्यंत त्याने प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. आता सोशल मीडियावर एक जाहिरात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो साऊथ इंडस्ट्री अभिनेता महेश बाबूसोबत दिसत आहे. नुकतंच हे दोघंही माऊथ फ्रेशनरच्या जाहिरातीत एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले, जे पाहिल्यानंतर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या जाहिरातीमुळे त्यांना खूप ट्रोल केलं जात आहे.

पूर्वी, एक प्रसिद्ध माउथ फ्रेशनर जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यात महेश आणि टायगरची झलक दिसली होती. हे पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. 1 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चाहत्यांना उत्तर आणि दक्षिणचे दोन प्रसिद्ध सुपरस्टार एकत्र पाहण्यात खूप मजा आली. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

काही सोशल मीडिया युजर्स आहेत जे टायगरला सपोर्ट करत असल्याचे दिसत आहेत, तर काही असे आहेत जे टायगरला जाहिरातीत पाहून खूश नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की अशा तंदुरुस्त अभिनेत्याने अशा जाहिराती करू नये.

काही लोक होते ज्यांनी एका स्क्रिनवर महेश आणि टायगरला एकत्र पाहण्यात रस दाखवला. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘हे बघितल्यानंतर मला टायगर आणि महेशने एकत्र चित्रपट करावा अशी इच्छा आहे.’ त्याचवेळी दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘बॉलिवूडमध्ये सुपरस्टार महेश बाबूच्या प्रवेशाची वाट पाहत आहे.’ दोन्ही सुपरस्टार्सच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, टायगर शेवटच्या वेळी ‘बागी 3’ मध्ये दिसला होता. आता तो ‘हिरोपंती 2’ आणि ‘गणपत’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर महेश आता ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटाचा एक भाग आहे.

संबंधित बातम्या

Video: विवाहाचा सर्वोत्तम प्रस्ताव, उद्योगपती हर्ष गोयंकांनाही व्हिडीओ आवडला, विवाह प्रस्तावावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Video: LED वर शिकवायला गेले आणि रोमॅन्टिंक गाणं सुरु झालं, पोरांचा शाळेच्या वर्गातला दंगा सोशल मीडियावर व्हायरल

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI