Video: LED वर शिकवायला गेले आणि रोमॅन्टिंक गाणं सुरु झालं, पोरांचा शाळेच्या वर्गातला दंगा सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ एका कोचिंग क्लासचा आहे. जिथं शिक्षक LED मुलांना शिकवत होते, पण त्यावर अचानक एक रोमँटिक गाणं सुरु झालं. त्यानंतर जो वर्गात दंगा झाला, तोच दंगा हा व्हिडीओत दिसतो आहे.

Video: LED वर शिकवायला गेले आणि रोमॅन्टिंक गाणं सुरु झालं, पोरांचा शाळेच्या वर्गातला दंगा सोशल मीडियावर व्हायरल
जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना काही समजावत असतात, तेव्हा अचानक एलईडी स्क्रीनवर काहीतरी घडते, हे पाहून तिथे उपस्थित सर्व मुले -मुली मोठ्याने हसायला लागतात.

सोशल मीडियाच्या जगात कधी आणि कुठल्या गमती-जमती होतील कुणीच सांगू शकत नाही. यातील काही व्हिडिओ असे आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्ही भावूक होता, तर काही असे असतात की ते पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसता. सध्या ऑफलाईन क्लासचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ एका कोचिंग क्लासचा आहे. जिथं शिक्षक LED मुलांना शिकवत होते, पण त्यावर अचानक एक रोमँटिक गाणं सुरु झालं. त्यानंतर जो वर्गात दंगा झाला, तोच दंगा हा व्हिडीओत दिसतो आहे. ( viral video teacher was teaching a subject on led to students suddenly a romantic bollywood song playing )

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक विद्यार्थी एकाच हॉलमध्ये बसलेले आहेत, तर एक शिक्षक त्यांना कुठल्यातरी विषयावर शिकवत आहेत, विद्यार्थ्यांना समजवून सांगण्यासाठी ते टीव्हीचा वापर करतात. या व्हिडिओमध्ये, तुम्हाला भिंतीवर एक एलईडीही दिसत असेल, जो कदाचित विद्यार्थ्यांना तांत्रिक गोष्टी किंवा काही विषय समजावून सांगण्यासाठी बसवण्यात आला आहे. मात्र, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना काही समजावत असतात, तेव्हा अचानक एलईडी स्क्रीनवर काहीतरी घडते, हे पाहून तिथे उपस्थित सर्व मुले -मुली मोठ्याने हसायला लागतात.

चला आधी हा व्हिडीओ पाहू:

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

जेव्हा शिक्षक या विद्यार्थ्यांना समजून सांगत असतात, तेव्हा अचानक एका हिंदी चित्रपटाचे एक रोमँटिक गाणं एलईडीवर प्ले होतं. या दरम्यान, शिक्षक देखील विचारात पडतात की, हे असं कसं झालं. काही काळासाठी ते एलईडीच्या दिशेनेही पाहू लागतात. दरम्यान, या काळात विद्यार्थी मोठ्याने हसत राहतात. या वर्गातील मुलींची एक्स्प्रेशनही बघण्यासारखे आहेत.

Bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवर एका मिनिटापेक्षा कमी कालावधीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ऑफलाइन वर्गाची गोष्टच वेगळी असते. या व्हिडीओवर लोक तुटून पडले आहे, आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा:

Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

Video: अजून एका डान्सिंग अंकलचे ठुमके सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून सगळं टेन्शन विसरलो!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI