Viral Video : चोराला पकडण्यासाठी पोलिसवाला बनला सिंघम, चोर-पोलिसाचा खेळ सीसीटीव्हीत कैद!

तुम्ही चोर पोलिसांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण आता जे समोर आले आहे त्याने तुमचा उर भरुन येईल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल - ये तो दबंग है.

Viral Video : चोराला पकडण्यासाठी पोलिसवाला बनला सिंघम, चोर-पोलिसाचा खेळ सीसीटीव्हीत कैद!
चोराला पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी बनला सिंघम
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 4:50 PM

देशभरात शांततेचं आणि कायदा सुव्यवस्थेचं वातावरण ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. शांतता राखण्यासाठी प्रसंगी पोलीस आपले प्राणही देतात. तुम्ही चोर पोलिसांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण आता जे समोर आले आहे त्याने तुमचा उर भरुन येईल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल – ये तो दबंग है. व्हायरल होणारा व्हिडीओ एखाद्या चित्रपटाच्या थ्रीलर सीनपेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या पोलिस कर्मचाऱ्याचं खूप कौतुक केलं आहे. (Police bravery in capturing thief captured on CCTV, video goes viral )

हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही गजबजलेला बाजार पाहू शकता. या फुटेजमध्ये एक पोलीस चोरट्याचा पाठलाग करताना दिसत आहे. पाठलाग करताना, पोलीस कर्मचार अचानक पडतो, पण तो हिंमत हारत नाही, उठून पुन्हा चोरट्याच्या मागे जातो. या पोलिसाचं धाडस पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच पोलीस कर्मचाऱ्याचेही खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ arava_gandham नावाच्या ट्विटर युजरने त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका युजरने लिहिले, ‘ हा पोलीस कर्मचारी कुणा दबंगपेक्षा कमी नाही. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, ‘सर जी, तुम्ही आमची मनं जिंकली’ तिसऱ्याने लिहिलं, ‘माझा कॉन्स्टेबल आर प्रसाद आणि सर्व पोलिसांना सलाम…तुमचा खूप अभिमान वाटतो. ‘याशिवाय, काहींनी हार्ट इमोजीज शेअर केले आहेत. तुम्ही देखील कमेंट करून सांगा की या दबंगचा उत्साह कसा होता.