Pre-Wedding Shoot In Gym: आरारारा रा खतरनाक! जिममध्ये व्यायाम करताना प्री वेडिंग, नारीशक्ती व्हायरल

पुरुषच नव्हे, तर हल्ली स्त्रियाही आपल्या फिटनेसकडे जरा जास्तच लक्ष देत आहेत. रोज जिममध्ये जाऊन विविध प्रकारचे व्यायामप्रकार करणे आता महिलांसाठीही सामान्य झाले आहे.

Pre-Wedding Shoot In Gym: आरारारा रा खतरनाक! जिममध्ये व्यायाम करताना प्री वेडिंग, नारीशक्ती व्हायरल
Pre wedding shoot in Gym
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 29, 2022 | 11:31 AM

आजकाल लोक त्यांच्या फिटनेसकडे (Fitness) खूप लक्ष देत आहेत आणि हे देखील महत्वाचे आहे, कारण तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहारासह नियमित व्यायाम देखील खूप महत्वाचे आहेत. पुरुषच नव्हे, तर हल्ली स्त्रियाही आपल्या फिटनेसकडे जरा जास्तच लक्ष देत आहेत. रोज जिममध्ये जाऊन विविध प्रकारचे व्यायामप्रकार करणे आता महिलांसाठीही सामान्य झाले आहे. जिममध्ये घाम गाळणाऱ्या लोकांचे व्हिडिओही अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण तो काही वेगळाच आहे, कारण त्यात एक नवरी साडी आणि भरपूर दागिने घालून जिममध्ये (Pre-Wedding Shoot In Gym) घाम गाळताना दिसतीये.

साडी नेसून जिम करणारी ही महिला

असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यात लोक वेगवेगळे कपडे घालून जिम करताना दिसत आहेत, पण साडी नेसून जिम करणारी ही महिला जरा वेगळी वाटते असंच काहीसं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, साडी नेसलेली एक महिला, जिच्या अंगावर भरपूर दागिने आहेत ती जिममध्ये डंबेल्स उचलते. यानंतर ती आणखी अनेक प्रकारचे व्यायाम करताना दिसते.

प्री-वेडिंग शूट

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही महिला साडी नेसून आणि दागिने घालून जिममध्ये का आलीये. खरंतर हे या महिलेचं प्री-वेडिंग शूट आहे. आजकाल प्री-वेडिंग शूटचं फॅड आहे. प्री-वेडिंग म्हणजे लग्नाआधी वधू-वर फोटोशूट करून घेतात, ज्यात पार्टनरसोबतचे काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद होतात. नववधूचा हा अनोखा प्री-वेडिंग शूट व्हिडिओ पूनम दत्ता नावाच्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. 27 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लग्नाआधी दंगलीसाठी तयारी

एका यूजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, ‘तिला माहित आहे की ती लग्नाआधी दंगलीसाठी तयारी करतीये ‘, तर दुसऱ्या एका युझरने देखील अशाच प्रकारे लिहिले आहे की, ‘शेवटच्या वेळी जिममध्ये जाणे आहे, सासरी गेल्यानंतर जिममध्ये जायला मिळेल नाही मिळेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नवरदेवाने काळजी करू नये, बी पॉझिटिव्ह.”