AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आग्रा किल्ल्यात शिवरायांचे स्मारक होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आता एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २० पाने मिळाली आहेत, येथून पुढे मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

आग्रा किल्ल्यात शिवरायांचे स्मारक होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
devendra fadnavis
| Updated on: Feb 19, 2026 | 10:44 PM
Share

ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते. त्या ठिकाणाहून शिवाजी महाराज यांनी स्वत:ची गनिमीकाव्याने सुटका करुन घेतली. त्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली होती. त्यासाठी जागा अधिगृहीत करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. येथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येईल. आणि २०३० ला नरेंद्र मोदी हे आग्रा किल्ल्यावर येतील आणि त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आग्रा येथील लाल किल्ला परिसरात झालेल्या शिवजयंती कार्यक्रमा प्रसंगी प्रसारमाध्यमाशी बोलत होते,त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

मुगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशात शिकवला केला पाहिजे, Ncert ने मुगलांचा इतिहासाला १७ पाने दिली होती. मात्र, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा यांच्यासाठी केवळ एक पॅराग्राफ दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २० पाने मिळाली आहेत, मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात औरंगजेबची कबर खोदली गेली

मुघलांनी देशात अत्याचार सुरू केला होता तेव्हा जिजाऊंनी, शिवाजी महाराजांना मुगलांचे काम न करता राजा बनायचे आहे, आणि त्यासाठी लढून स्वराज्य मिळवायचे आहे, असे विचार रुजवले. शिवाजी महाराज हे सूर्य किरणासारखे होते. शिवाजी महाराज जेव्हा स्वर्गवासी झाले, तेव्हा औरंगजेबाला वाटले मी हे स्वराज संपवून टाकेल. पण त्याला माहित नव्हते शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजी महाराज नऊ वर्षे लढले. त्याच महाराष्ट्रात औरंगजेबची कबर खोदली गेली असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

लाल किल्ला ही आमची स्वाभिमानाची भूमी

लाल किल्ला ही आमची स्वाभिमानाची भूमी आहे. महाराष्ट्रात छत्रपतींचे जल दुर्ग नसते तर हिंदवी स्वराज्य बनले नसते. आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणे हे विशेष आहे. लवकर उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांना कैद केले होते त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतील असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...