AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं...

रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं…

| Updated on: Jul 08, 2026 | 12:47 PM
Share

मुंबईतील भांडुप परिसरात आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मुंबईतील भांडुप परिसरात आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडला. बसने अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्यावरील पादचारी आणि काही वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात पादचारी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली असून, अपघातग्रस्त वाहनांचीही पाहणी करण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 08, 2026 12:47 PM

Follow Us