AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | ठाकरे गटाचं ठरलं! दुसरा टप्पा नागपूर... उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Uddhav Thackeray | ठाकरे गटाचं ठरलं! दुसरा टप्पा नागपूर… उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jul 08, 2026 | 11:49 AM
Share

उबाठा ठाकरे गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 'ऑपरेशन टायगर 3,0' वरही सुचक विधान केलं. इतकेच नाही तर त्यांनी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन सांगितला. आधी मुंबई, आता पुढचा टप्पा राज्याची उपराजधानी नागपूर असेल.

उबाठा ठाकरे गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ‘ऑपरेशन टायगर 3,0’ वरही सुचक विधान केलं. इतकेच नाही तर त्यांनी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन सांगितला. संजय राऊत म्हणाले की, राममंदिरातील लुटीबाबत आता पक्षाने ठरवलं आहे. आधी मुंबई, आता पुढचा टप्पा राज्याची उपराजधानी नागपूर असेल.

पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आंदोलनासाठी जाणार असून तिथे खूप मोठं रामरक्षा आंदोलन करण्याचा निर्णय राऊतांनी सांगितला. त्यांनी सांगितले की, आंदोलन भव्य होणार असून तयारीसाठी तसेच इतर कामकाजासाठी लवकरच ते नागपूरला रवाना होतील. अलीकडे आमदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी इतर विषयांवरही प्रकाश टाकला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला. “महाराष्ट्र आणि इतर भागात लूट करून त्यांना कोणतीही किंमत मोजून या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी दिल्लीसाठी ते किंमत मोजायला तयार आहेत. हे मी ऑनरेकॉर्ड बोलत आहे. त्यातील ५० टक्के त्यांनी मोजली आहे. आता बघू काय होतंय. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली फेऱ्या अलीकडे वाढल्या असू शकतात. या पैशाच्या ताकदीपुढे देवेंद्र फडणवीस हतबल झालेले दिसत आहेत. हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर वाढवला भारतीय जनता पक्षाने. आता तो भस्मासूर फडणवीस आणि अमित शाह यांच्या मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

Published on: Jul 08, 2026 11:49 AM

Follow Us
मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले? जयंत पाटलांनी सांगितला थेट सर्व घटनाक्रमच, देवेंद्र फडणवीस...

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले? जयंत पाटलांनी सांगितला थेट सर्व घटनाक्रमच, देवेंद्र फडणवीस..

Jayant Patil : असा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण दादांच्या निधनानंतर सीन..जयंत पाटलांनी जे काय आहे ते स्पष्टच सांगून टाकलं.

Jayant Patil : असा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण दादांच्या निधनानंतर सीन..जयंत पाटलांनी जे काय आहे ते स्पष्टच सांगून टाकलं

Jayant Patil : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह मुख्यमंत्र्यांची भेट? योगायोग की अजून काही? जयंत पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी.

Jayant Patil : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह मुख्यमंत्र्यांची भेट? योगायोग की अजून काही? जयंत पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Sanjay Raut: पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला… अशी दिली तिखट प्रतिक्रिया.

Sanjay Raut: पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला… अशी दिली तिखट प्रतिक्रिया

IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?.

IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?

डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट, शरद पवारांनी पाठिंबा देताच राऊत आक्रमक; थेटच सांगितलं...

डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट, शरद पवारांनी पाठिंबा देताच राऊत आक्रमक; थेटच सांगितलं..