Karjat Rain Update | बंधारा फुटला अन् नदीला पूर! नदीकाठच्या गावांना तातडीचा सतर्कतेचा इशारा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रायगड जिल्ह्यालाही बसला आहे, कर्जत तालुक्यातील पेठ-आंबिवली येथील बंधारा फुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बंधारा फुटल्यानंतर परिसरातील चिल्लर नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यावर मोठा ताण निर्माण झाला आणि अखेर बंधारा फुटला. त्यानंतर चिल्लर नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाल्या असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि नदीपात्र तसेच पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Jul 08, 2026 12:02 PM
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?