
जीव घेणाऱ्यापेक्षा प्राण वाचवणारा मोठा असतो, ही म्हण तर आपण अनेकदा ऐकली असेल. खरंतर जंगलाता असं दृश्य खूप कमी दिसत की एखादा प्राणी दुसऱ्याची शिकार करतोय आणि इतर एखाद्या प्राण्याने किंवा माणसाने त्या प्राण्याचा जीव वाचवला असेल. पण सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून अनेक लोकं खुश झाले आहेत. खरंतर, एक भलामोठ्ठा अजगर हरणाची शिकार करत होता, पण तेवढ्यात एक महिला तिथे पोहोचते आणि हरणाचा जीव वाचवते.त्यानंतर जे दृश्य दिसतं ते केवळ आश्चर्यकारकच नाही तर ते पाहून तुमचे मनही खुश होईल.
काय आहे तो व्हिडीओ ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या कडेला एका अजगराने एका हरणाला घट्ट पकडले होते. मात्र तेवढ्यात तेथून जाणाऱ्या एका महिलेचे तिकडे लक्ष गेलं आणि हरिणाचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. कारमध्ये असलेली ती महिला उतरली आणि एका काठीने त्या अजगराला मारत पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण ते पाहून तो अजगर चिडला, संतापला आणि त्याच महिलेवर हल्ला केला. पणती महिला कशीबशी त्या अजगराला हाकलून लावण्यात यशस्वी होते आणि हरणाचा जीव वाचवते. ते पाहून ते हरीण थेट महिलेकडे गेले. दयाळू महिलेने हरणाला जंगलातून घरी आणले, त्याच्यावर उपचार केले आणि मुलासारखे वाढवले. आता, हरण तिच्या कुटुंबाचा एक सदस्य बनला आहे.
Spašena od udava i postala član porodice♥️ pic.twitter.com/kttxzAWxCV
— Zoran Nemanjic (@NemanjicZoran) October 15, 2025
घरात राहू लागलं हरीण
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर हा व्हिडिओ @NemanjicZoran या आयडीने शेअर केला आहे. एका मिनिटाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 47 हजार पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 2 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट केली की, ‘निसर्गातही न्याय असतो!’, तर दुसऱ्या यूजरने लिहंली की, ‘हरीण खूप भाग्यवान होते, अन्यथा अजगराच्या तावडीतून सुटणे अशक्य असते.’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.