प्रवाशांकडून एक करोड दंड वसूल करणारी पहिली महिला तिकीट चेकर, रेल्वे कडून कौतुक!

| Updated on: Mar 24, 2023 | 5:09 PM

त्यांच्या या कामगिरीमुळे रेल्वे मंत्रालयाचेही कौतुक झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले.

प्रवाशांकडून एक करोड दंड वसूल करणारी पहिली महिला तिकीट चेकर, रेल्वे कडून कौतुक!
Smt.Rosaline Arokia Mary
Image Credit source: Social Media
Follow us on

दक्षिण रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक रोजलिन अरोकिया मेरी यांनी अनियमित आणि विनातिकीट प्रवाशांकडून एकूण 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे रेल्वे मंत्रालयाचेही कौतुक झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले.

रेल्वे मंत्रालयाकडून मेरीचे अभिनंदन

मंत्रालयाने त्यांच्या ड्युटीच्या वेळेतील छायाचित्रे ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. GMS रेल्वेच्या सीटीआय (मुख्य तिकीट निरीक्षक) श्रीमती रोजलिन अरोकिया मेरी यांनी अनियमित/ विनातिकीट प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल करणारी भारतीय रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांमध्ये पहिली महिला ठरली आहे. त्या प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील प्रवाशांकडून दंड वसूल करत आहेत आणि तिकिटे तपासत आहेत.

एवढी मोठी रक्कम आकारणारी ती तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांपैकी पहिली महिला ठरल्याने या पोस्टने ऑनलाइन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका युजरने ट्विटरवर लिहिलं आहे की, आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी अशा चॅलेंजिंग आणि समर्पित महिलांची गरज आहे. “तुम्ही छान काम केलंत. तुम्हाला सलाम.”