तोड नाय तोड नाय! एक नंबर डान्स, कुणालाच जमणार नाही

हा व्हिडिओ पाहून प्रोफेशनल डान्सर्सही हैराण होतील. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय असून 13 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

तोड नाय तोड नाय! एक नंबर डान्स, कुणालाच जमणार नाही
break dance viral video
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 01, 2022 | 4:24 PM

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हास्यास्पद करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये एक चिनी मजूर अप्रतिम ब्रेक डान्स करताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये या व्यक्तीने अशा डान्स मूव्ह्ज दाखवल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून प्रोफेशनल डान्सर्सही हैराण होतील. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय असून 13 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका बांधकाम साइटवरील असल्याचे दिसत आहे. जिथे तुम्हाला आजूबाजूला बसलेले अनेक मजूर दिसतात.

दुसऱ्या क्षणी एक मजूर उठतो आणि मग अप्रतिम ब्रेक डान्स करू लागतो. हा माणूस अशा काही नृत्य दाखवतो की बाकीच्या साथीदार टाळ्या वाजवायला लागतात.

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल – असं वाटतंय की हा माणूस चुकीच्या प्रोफेशन मध्ये अडकला आहे. हा तर नृत्यक्षेत्रात असायला हवा होता.

@TansuYegen नावाच्या हँडलने हा अफलातून डान्स व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शननुसार, हा व्हिडिओ चीनच्या हुबेई प्रांतातील आहे. जिथे एका कामगाराने अचानक बांधकाम साइटवर ब्रेक डान्स करत आपल्या सहकाऱ्यांचा सरप्राईज दिलं.

ही क्लिप आतापर्यंत 13 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेलीये, तर 67,000 हून अधिक लोकांनी ती पसंत केली आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडतोय की तेही तो भन्नाट व्हिडीओ शेअर करत आहेत.

आतापर्यंत 10 जणांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. ही संख्या सतत वाढत आहे. तसे तर हा व्हिडिओ जुना आहे, जो पुन्हा व्हायरल होत आहे.