Saving Tips: 9 ते 5 जॉब करुन कर्जाविना घेतलं 70 लाखांचं घर, महिलेने सांगितला बचतीचा सिक्रेट फॉर्म्युला, 2 खाती अन्…

एका महिलेने कर्जाची कोणतीही झंझट न ठेवता तब्बल 70 लाखाचे हक्काचे घर खरेदी केले आहे. सोबतच तिने बचतीचा सिक्रेट फॉर्म्युलाही सांगितला आहे.

Saving Tips: 9 ते 5 जॉब करुन कर्जाविना घेतलं 70 लाखांचं घर, महिलेने सांगितला बचतीचा सिक्रेट फॉर्म्युला, 2 खाती अन्...
| Updated on: Nov 09, 2026 | 3:10 PM

Viral Video:  स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचे स्वप्न असते. नोकरी करत अनेकजण कर्ज काढून घराचे स्वप्नही पुर्ण करतात. मात्र 9- 5 जॉब करणाऱ्या एखाद्याने कोणतेही कर्ज न काढता घर घेतले तर? ऐकून विश्वास बसणार नाही मात्र महाराष्ट्रामधीलच एका महिलेने कर्जाची कोणतीही झंझट न ठेवता तब्बल 70 लाखाचे हक्काचे घर खरेदी केले आहे. सोबतच तिने बचतीचा सिक्रेट फॉर्म्युलाही सांगितला आहे. काय आहे हा सेव्हिंगचा सिक्रेट फॉर्म्युला वाचा..

कोणतेही कर्ज न घेता घेतलं 70 लाखांचं घर!

Loading...

कोणत्याही कर्जाच्या त्रासाशिवाय घर खरेदी करणे खरंच शक्य आहे का? महाराष्ट्रातील शहाड येथील एका महिलेने हे शक्य करून दाखवले आहे. तिने कोणतेही कर्ज न घेता 70 लाख रुपयांचे घर खरेदी केले आहे. तिने आपला हा अनोखा तीन वर्षांचा बचतीचा प्रवास सोशल मीडियावर शेअर केला. त्या महिलेने सांगितले की, तिच्या फ्लॅटची किंमत 60 लाख रुपये होती, परंतु घराच्या सजावटीसह एकूण खर्च सुमारे 70-लाख रुपये झाला. तिने तीन वर्षांत संपूर्ण रक्कम फेडली. तिने पहिल्या वर्षी 4 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 5.5 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9.5 लाख रुपये वाचवले. याव्यतिरिक्त, तिने 1 लाख रुपये एमर्जन्सीसाठी बाजुला ठेवले.

कशी केली बचत अन् प्लॅनिंग? 

तिचे सोपे सूत्र होते दोन बँक खाती ठेवणे. यामधील एक “पगाराचे खाते अन् दुसरे घराचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी काढलेले खाते. पगार मिळताच, त्यातील मोठा भाग घराच्या खात्यात जमा व्हायचा, ज्यात अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कोणतेही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नव्हते. अशा प्रकारे ती गृहकर्जाच्या जाळ्यातून सुटली. सुरुवातीला, तिने कर्ज घेण्याचा विचार केला, पण वडिलांच्या सल्ल्यानुसार ती थेट बिल्डरशी बोलली. घराचे बांधकाम सुरू असल्याने, तिने बांधकामाशी संबंध जोडून बिल्डरला हप्त्यांमध्ये पैसे देण्यास राजी केले. असे ठरले की, ती पुढील 36 महिन्यांसाठी दरमहा 1,00,000 रुपये आणि घराचा ताबा मिळाल्यावर उर्वरित 8,00,000 रुपये देईल.

या संपूर्ण योजनेची सर्वात मोठी ताकद तिची सेल्सची नोकरी होती. तिच्या पगाराव्यतिरिक्त तिला दरमहा 1,00,000 ते 15,00,000 रुपयांचे प्रोत्साहन भत्ते मिळत होते, जे तिने पूर्णपणे बचतीमध्ये गुंतवले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, तिने तिचे जुने घर विकले नाही, उलट त्याचे नूतनीकरण करून ते भाड्याने दिले आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवले. थोडक्यात काय “घाबरू नका, फक्त योग्य नियोजन करा आणि कामाला लागा, असा सल्लाच या महिलेने दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us