
आपण सगळेचजण रेल्वेने प्रवास करतो. भारतातील लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. बरं रेल्वेनं प्रवास करताना रेल्वेचे नियम पाळणे गरजेचे असते. त्यातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे ट्रेनचे तिकिट. कारण ते नसेल तर अर्थातच तुम्हाला दंड भरावा लागेल. आणि आजकाल तर लोकल ट्रेन असो किंवा लांब पल्ल्याती एक्सप्रेस असो अनेकदा या प्रवासादरम्यानचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
टीसीच्या हँडसम दिसण्यामुळे व्हिडीओ व्हायरल
असाच एका एक्सप्रेसमधला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ एका टीसीचा आहे. पण हा व्हिडीओ कोणत्या भांडणामुळे किंवा प्रवाशासोबतच्या वादामुळे झालेला नाहीये तर चक्क टीसीच्या हँडसम दिसण्यामुळे झाला आहे. होय, एका महिला प्रवाशाने हा व्हिडीओ काढला आहे. या मुलीने हा व्हिडीओ व्हायरल करत म्हटलं आहे की, जर आम्हाला दररोज असा तिकीट तपासणारा टीसी दिसणार असेल तर मी दररोज ट्रेनने प्रवास करायला तयार आहे.
टीसीचे व्यक्तिमत्व बॉलिवूड हीरोपेक्षा कमी नाही
व्हायरल व्हिडिओमध्ये, हा टीसी एसी कोचमध्ये तिकिटे तपासताना दिसत आहे. तो खरंच खूप देखणा दिसतोय. त्याचे व्यक्तिमत्व एखाद्या बॉलिवूड हीरोपेक्षा कमी वाटत नाहीये. सोशल मीडियावर या टीसीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे हा टीसी रातोरात स्टार झाला आहे. हा व्हिडीओ काढला आहे तो शताब्दी एक्सप्रेसचा आहे. कारण व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने पोस्टमध्ये #ShatabdiExpress असा हॅशटॅग देखील या व्हिडीओला दिला आहे. मुख्य म्हणजे ती महिला प्रवासी आपला व्हिडीओ काढत आहे याची त्या टीसीला अजिबातच कल्पनाही नाहीये.
व्हिडीओवर हजारो लाईक्स अन् कमेंट्स
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर foodwithepshi नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 35 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 93 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. दरम्यान या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सही आल्या आहेत.
व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या त्या मुलीला युजर्सचे गंमतीशीर सल्ले
नेटकऱ्यांनी व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या त्या मुलीला कमेंट्समध्ये मजेशीर सल्लेही दिले आहेत. एका युजरने गंमतीने लिहिले आहे, ‘खिडकीतून तिकीट फेकून दे, मग तो तुला पकडून घेऊन जाईल’, तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘ तो सरकारी नोकरीवाला आहे… त्याला खूप सुंदर बायको मिळेल. तू उगाच स्वप्न पाहू नकोस’. त्याचप्रमाणे, एकाने कमेंट केली की, ‘सरकारी कर्मचाऱ्याला कधीही कमी लेखू नको’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्हीही या टीसीईमुळे प्रसिद्ध झालात’.