निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेला आणि…व्हिडीओ शेवटपर्यंत बघा! धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

फिरायला जाताना घरच्यांचा नेहमी सल्ला असतो की जपून जा, पाण्याजवळ जाताना काळजी घ्या. समुद्रात, नदीत फार आत जाऊ नका. असे सल्ले ऐकायचा आपल्यालाही वैताग आलेला असतो. हा व्हिडीओ बघून तुम्हाला कळेल की आपल्याला असं का सांगितलं जातं. व्हिडीओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय.

निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेला आणि...व्हिडीओ शेवटपर्यंत बघा! धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
trending news
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 12, 2023 | 3:36 PM

मुंबई: काही व्हिडीओ बघून आपल्याला धक्का बसतो. आधी व्हिडीओ बघताना वाटतं काहीतरी खूप छान असेल, पण व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिला की धक्का बसतो. छानपणे एखादा व्हिडीओ सुरु असतो, निसर्गरम्य वातावरण असतं आणि मध्येच काहीतरी घडतं मग आपल्यालाच धक्का बसतो. पावसाळ्यात पर्यटकांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मुंबई मधला होता. एक जोडपं समुद्रकिनारी फोटो काढत असतं आणि अचानक मोठी लाट येते. जोडप्यामधील महिला लाटेसोबत वाहून जाते. सुरवातीला हा धक्कादायक व्हिडीओ बघताना जराही कल्पना नसते की पुढे असं काही घडेल.

व्हिडीओ शेवटपर्यंत बघा!

लहानपणापासून आपल्याला सांगितलं गेलंय की पावसाळ्यात फिरायला जाताना जरा जपून जावं. समुद्रकिनारी, धबधब्याजवळ, नदीकाठी जरा जपून लक्ष देऊन असावं. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात उत्साही पर्यटक एका ठिकाणी फिरायला जातात. या व्हिडीओला 1.29 लाख लोकांनी पाहिलंय. यावर लोकांनी लिहिलंय, ‘कौन है ये लोग भाई जो ऐसी हरकत कर रहे हैं’. दुसरा युजर लिहितो, ‘पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी जपून जा!’. खूप लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. सुंदर धबधबा आणि निसर्ग पाहिल्यावर आपल्यालाही हा व्हिडीओ बघायची इच्छा होते. पण व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यावर पुढे काय होतं? बघा…

भयानक दृश्य

या व्हिडीओमध्ये दिसतंय की मित्र-मित्र सोबत मिळून मस्त फिरायला गेलेत. तिथे एक सुंदर धबधबा आहे. जसा व्हिडीओ पुढे पुढे जातो, आपल्याला तो धबधबा पूर्ण पाहायची इच्छा होते. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. कॅमेरा जसा फिरतो, आपल्याला धबधबा दिसतो. त्यात अनेक लोक दिसतात. निसर्गरम्य ठिकाणी आहे, धबधबा आहे, एक माणूस तिथे एका दगडावर हात ठेवायला जातो आणि वरून दरड कोसळते. हे भयानक दृश्य बघून आपल्याला सुद्धा धक्का बसतो.