Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईचा आहे. या दोघांची लढाई चांगलीच रोमहर्षक असून या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ
snake mongoose-bangerous-battle


मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईचा आहे. या दोघांमधील लढाई चांगलीच रोमहर्षक असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Snake and Mongoose fight went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक साप आणि एक मुंगूस दिसत आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक साप रस्त्यावर आल्याचे दिसतेय. हा साप रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. रस्ता ओलांडताना या सापावर अचानकपणे मुंगुसाने हल्ला केला आहे. मुंगुसाच्या कचाट्यात सापडल्यानंतर हा साप स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडतोय. तर सापाला गिळंकृत करण्यासाठी मुंगूस जमेल तो प्रयत्न करत असल्याचे दिसतेय.

लढाई पाहून वाहनचालक रस्त्यावर थांबले

भर रस्त्यावरच साप आणि मुंगुसाची ही लढाई सुरु आहे. या रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरु आहे. मात्र, साप आणि मुंगुसाची ही लढाई पाहून वाहनचालकसुद्धा थबकून रस्त्यावर उभे राहिले आहेत. साप आणि मुंगुसाची ही झुंज प्रवासी पाहत आहेत.

शेवटी मुंगुसाने सापाची शिकार केली

या लढाईमध्ये साप मुंगुसाच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला आहे. सापाने आपले तोडं लपवल्याचेसुद्धा आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. मात्र,यावेळीच मुंगुसाने सापाला एका क्षणात पकडले आहे. मुंगुसाने सापाला आपल्या तोंडात पकडून त्याची शिकार केली आहे. तसेच मुंगूस पकडलेल्या सापाला घेऊन जाताना आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या Jaat Entertainment नावाच्या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओला लाईक करत असून शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | लाकडी फळीच्या मदतीने भारी जुगाड, पण मध्येच खेळ बिघडला, दुचाकी थेट पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल

Video | इंजेक्शन पाहून घाबरली, सुई टोचताच मुलांसारखं लागली रडायला, महिलाचे मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | तरुण विनामास्कचा रेल्वेमध्ये चढला, महिलांनी शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ एकदा पाहाच

(Snake and Mongoose fight went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI