Video | इंजेक्शन पाहून घाबरली, सुई टोचताच मुलांसारखं लागली रडायला, महिलाचे मजेदार व्हिडीओ व्हायरल

सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तर चांगलाच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेची इंजेक्शन घेतानाची फजिती मार्मिकपणे दाखवण्यात आली आहे.

Video | इंजेक्शन पाहून घाबरली, सुई टोचताच मुलांसारखं लागली रडायला, महिलाचे मजेदार व्हिडीओ व्हायरल
women crying while taking injection


मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं व्यापक आहे. या माध्यमावर जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती आपल्याला एका मिनिटात समजते. जगभरातील अविष्कार तसेच आश्चर्यचिकत करणाऱ्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेच समजतात. मात्र, याच मंचावर अशा काही बाबी समोर येतात ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. असे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तर चांगलाच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेची इंजेक्शन घेतानाची फजिती मार्मिकपणे दाखवण्यात आली आहे. (woman crying like child while taking injection video went viral on social media)

सुई पाहून महिला चांगलीच घाबरली

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला इंजेक्शन घेण्यासाठी नर्ससमोर बसल्याचे आपल्याला दिसत आहे. ही महिला इंजेक्शन घ्यायला बसलेली असून  ती चांगलीच घाबरलेली आहे. नर्सच्या हातामधील सुई पाहून काय करावे हे या महिलेला समजत नाहीये. याच कारणामुळे ती इंजेक्शन घेण्यास नकार देत आहे. महिलेच्या नकारामुळे नेमकं काय करावं हे नर्सलासुद्धा समजत नाहीये.

नर्सने डोकं लावलं आणि सुई टोचली

शेवटी नर्सने समोर बसलेल्या भित्र्या महिलेचा हात पकडला आहे. तसेच या महिलेशी बोलण्याचे नाटक केले आहे. नर्सने महिलेला तू जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेस ? असा प्रश्न केला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा महिलेने प्रयत्न केला आहे. मात्र याच वेळी महिलेच्या तोंडून शब्द फुटायच्या आत नर्सने तिच्या दंडामध्ये सुई टोचली आहे.

महिलेने लहान मुलांप्रमाणे टाहो फोडला

नर्सने अचानकपणे सुई टोचल्यामुळे महिला चांगलीच घाबरली आहे. सुई दंडाला लावताच महिलेने एखाद्या लहान मुलाप्रमाणे टाहो फोडला आहे. ही महिला मोठ्या आवाजात रडत आहे. तिच्या या विचित्र रडण्यामुळे नेटकरी खळखळून हसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, व्हायरल होणारा हा व्हिडीओ फेसबुकवर Saminder Singh Gill या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | तरुण विनामास्कचा रेल्वेमध्ये चढला, महिलांनी शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO: महिलेच्या अंगावर बसलेल्या पोलिसाचा फोटो व्हायरल, अखिलेश यादवांकडून हल्लाबोल

Video | गळ्यात वरमाला टाकताना नवरदेवाने केली नवरीची थट्टा, पुढे काय झालं ?

(woman crying like child while taking injection video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI