शांतपणे झोपली होती महिला, केसांमध्ये घुसला साप… व्हिडिओ पाहून थांबेल श्वास

Viral Video: साप रस्त्यावर दिसला तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. सर्पमित्र वगळता सापाला घाबरणार नाही, असे कोणीच नाही. अनेकांच्या शरीरावर साप पाहून काटे उभे राहतात. मग तो सापच तुमच्या केसांमध्ये फिरु लागला तर काय परिस्थिती होणार? या पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शांतपणे झोपली होती महिला, केसांमध्ये घुसला साप... व्हिडिओ पाहून थांबेल श्वास
snake
| Updated on: Jul 30, 2024 | 5:21 PM

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंवर अनेक कॉमेंट येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसणार आहे. त्या व्हिडिओमध्ये महिला शांतपणे झोपली आहे. त्यावेळी तिच्या केसांमध्ये साप घुसला आहे. परंतु तिला त्या सापाच्या हालचालीची काहीच माहिती समजत नाही. व्हिडिओमध्ये ती महिला थोडीफार हालचाल करताना दिसत आहे. परंतु साप असल्याचे तिला समजतसुद्धा नाही. यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

साप रस्त्यावर दिसला तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. सर्पमित्र वगळता सापाला घाबरणार नाही, असे कोणीच नाही. अनेकांच्या शरीरावर साप पाहून काटे उभे राहतात. मग तो सापच तुमच्या केसांमध्ये फिरु लागला तर काय परिस्थिती होणार? या पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडिओमध्ये साप महिलेच्या केसांमध्ये एखाद्या हेअर बँडप्रमाणे दिसत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ @kashikyatra या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. त्या इस्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्या व्हिडिओला हजारो जणांना लाइक केले आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या

एक यूजरने म्हटले आहे की, “हर हर महादेव”, दुसऱ्या व्यक्तीने साप नेहमी धोकादायक नसल्याचे म्हटले आहे. आणखी एका युजरने आपला व्यक्तीगत अनुभव शेअर केला आहे. आपल्यासोबत असेच झाले होते, असे त्याने म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओ बनवण्यासाठी साप सोडला आहे. तो पालतू साप आहे.