AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : Metroमध्ये जागा मिळवण्यासाठी असं काही नाटक केलं, की डबा झाला रिकामा!

Metro rail video : एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी असे नाटक केले, की त्याला सीट मिळाली. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या (Metro) डब्याच्या खांबाजवळ उभी आहे.

Viral Video : Metroमध्ये जागा मिळवण्यासाठी असं काही नाटक केलं, की डबा झाला रिकामा!
मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशानं केलं जुगाड
| Updated on: Feb 18, 2022 | 6:06 PM
Share

Metro rail video : मेट्रोने प्रवास करणे आता सामान्य झाले आहे. दिल्ली मेट्रो, मुंबईसारख्या शहरांमध्ये लोक आपला वेळ वाचवण्यासाठी मेट्रोने प्रवास करणे पसंत करतात. प्रत्येकजण या सार्वजनिक वाहतुकीचा चाहता असल्याने, अशा परिस्थितीत लोकांना मेट्रोमध्ये बसण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. कधी कधी तासनतास उभे राहून प्रवास करावा लागतो. मात्र, असे काही लोक आहेत जे प्रचंड गर्दीतही मेट्रोमध्ये बसण्यासाठी आपली जागा शोधतातच. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी असे नाटक केले, की त्याला सीट मिळाली. सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या (Metro) डब्याच्या खांबाजवळ उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. पण अचानक त्याला उलट्या झाल्यासारखे वागायला लागते.

घाबरून सीट करतात खाली

त्या व्यक्तीला अशा विचित्र अवस्थेला पाहुन तिथे बसलेल्या महिला आणि इतर लोक ताबडतोब आपल्या जागेवरून उभे राहतात आणि तेथून पळ काढतात. यानंतर ही व्यक्ती आनंदाने सीटवर बसते आणि मोबाइल चालवू लागतो. समोरच्या व्यक्तीची तब्येत बिघडली आहे असे वाटल्याने अनेक प्रवासी सीटही सोडतात. तर काही लोक कोरोना साथीच्या भीतीने अशा लोकांपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात आपली जागा रिकामी करतात.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘Amazing tactic.’ काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 31 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे, तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एक यूझर म्हणतो, की जेव्हा कोणी तुम्हाला जागा देण्यास जाणूनबुजून नकार देतो, तेव्हा अशी काही युक्ती चालवणे आवश्यक होते. दुसरा यूझर म्हणतो, की हा भाऊ खूप मजबूत निघाला. मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यानं अवलंबलेली युक्ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. याशिवाय इतरही अनेकांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 ?? (@hepgul5)

आणखी वाचा :

भावा, कशाला वेडेपणा करतोयस? तरसाचं चुंबन घेणाऱ्याला यूझर्स करतायत सावधान! Hyena video viral

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? ‘ही’ बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला ‘हा’ Video पाहा…

Cat dog video : कुत्रा तुपाशी, मांजर उपाशी! ‘असा’ लगावला ‘मौके पे चौका’ की नेटिझन्स म्हणतायत, हा तर Smartdog!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.