Pune Maha metro | मेट्रोची परवडणाऱ्या दारात सेवा देण्यासाठी मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Maha metro | मेट्रोची परवडणाऱ्या दारात सेवा देण्यासाठी मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
सांकेतिक फोटो

महामेट्रो प्रशासनाने पुणे मेट्रोने फेज 2 वर प्रत्यक्ष काम सुरू करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये संपूर्ण शहरात 82.5 किमीचा मार्ग विस्तारित केला जाणारा आहे.  या मार्गाच्या प्रस्तावित विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून तो मे महिन्यात राज्य सरकारला मंजुरीसाठी सादर केला जाईल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 07, 2022 | 8:00 AM

पुणे – शहारत वाहतुकी कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारात आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत मेट्रोचा दोन विभागांमध्ये 12 किमीचा मेट्रोमार्ग पूर्ण करणे अपेक्षित आहे. एकाकीकडे मेट्रोक मार्गाचे कामपूर्ण करत असताना दुसरीकडे पुणेकर नागरिकांनी मेट्रोचा वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यादृष्टीनेही मेट्रोक प्रशासन प्रयत्न करत आहे. यासाठी वाजवी दारात भाडे आकारणी करण्यावर भर दिला जात आहे.

इतर स्त्रोत्रातून महसूल मिळवण्याकडे लक्ष

पुणे मेट्रो रेल्वेत इतर स्रोतातून महसूल मिळवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी मेट्रो स्थानकात जाहिराती, तसेच व्यासायिका जागा भाडेतत्वावर आदी गोष्टीचा विचार केला जात आहे. यातूनच जवळपास 50 टक्के भाडेवाढ केली जात आहे. मेट्रोमध्ये भाडेवाड कामे ठेवता अधिक फेऱ्या करण्याला प्राधान्या देण्यात येणार आहे. मेट्रोतील तिकिटाचा दर अद्याप केला नसला तरी सुरुवातला भाडे हे 10 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती मेट्रोच्या प्रशासनाने दिली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या 12 किमीच्या मार्गामध्ये दोन विभाग आहेत, दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी पाच स्थानके आहेत. मेट्रोच्या उद्घाटनानंतर पुणे मेट्रो रेल्वेचे व्यावसायिक फेऱ्यांना सुरुवात होईल. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 33.1 किमीच्या दोन मार्गावरील सेवा – वनाझ ते रामवाडी आणि PCMC ते स्वारगेट या वर्षाच्या अखेरीस सुरू होतील. पुणे मेट्रो रेल्वेने या वर्षी मे महिन्यापर्यंत गरवारे कॉलेज ते सिव्हिल कोर्ट( शिवाजी नगर ) आणि फुगेवाडी ते रेंज हिल्सपर्यंतचे कार्य विस्तारण्याची योजना आखली आहे.

पुणे मेट्रोने फेज 2 चे काम सुरु

महामेट्रो प्रशासनाने पुणे मेट्रोने फेज 2 वर प्रत्यक्ष काम सुरू करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये संपूर्ण शहरात 82.5 किमीचा मार्ग विस्तारित केला जाणारा आहे.  या मार्गाच्या प्रस्तावित विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून तो मे महिन्यात राज्य सरकारला मंजुरीसाठी सादर केला जाईल. 82.5 किमीच्या प्रस्तावित विस्तारित मार्गामध्ये वनाज ते चांदणी चौकापर्यंत 1.5 किमी, रामवाडी ते वाघोली 12 किमी, हडपसर ते खराडी 5 किमी, स्वारगेट ते हडपसर 7 किमी, खडकवासला ते स्वारगेट 13 किमी, एसएनडीटी ते वारजे या 8 किमीचा समावेश आहे.

Neet : ‘नीट’संबंधी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात उद्या निकाल; पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याच्या सूचना

राष्ट्रवादीच्याच आमदारांकडून अजित पवारांच्या आवाहनाला तिलांजली; अशोक पवारांच्या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Kalyan-Dombivali: कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खाजगी डॉक्टरांची बैठक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें