Sonu Sood viral video : गुटखा फेकून दे ! रात्रीच्या अंधारात सोनू सूद टी-स्टॉलवर पोहोचला, तेव्हा त्या व्यक्तीला पाहून क्लास सुरू केला

सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यावेळी चहा विक्री करणाऱ्या तरुणाच्या तोंडात गुटखा असल्यामुळे सोनू सूद त्याला अनेक गोष्टी सांगत आहे.

Sonu Sood viral video : गुटखा फेकून दे ! रात्रीच्या अंधारात सोनू सूद टी-स्टॉलवर पोहोचला, तेव्हा त्या व्यक्तीला पाहून क्लास सुरू केला
Sonu Sood viral video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 17, 2023 | 7:52 AM

मुंबई – सोनू सूदने (Sonu Sood) कोरोनाच्या काळात लोकांना मदत केल्यापासून त्यांच्या गळ्यातील ताईत झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून (Maharashtra, Mumbai) इतर राज्यात जाणाऱ्या लोकांना सोनू सूदने चांगली मदत होती. तेव्हा सुध्दा सोनू सूदचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Sonu Sood viral video) झाले होते. सध्या सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो रात्रीच्यावेळी एका चहाच्या स्टॉलवर पोहोचला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यावेळी चहा विक्री करणाऱ्या तरुणाच्या तोंडात गुटखा असल्यामुळे सोनू सूद त्याला अनेक गोष्टी सांगत आहे. सोनूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोक त्यावर कमेंट करीत आहेत.

सोनू रात्रीच्या वेळेस चंद्रपूरपासून नागपूरपर्यंत चहाच्या दुकानावर थांबत आहे. त्याचबरोबर तिथं उतरल्यानंतर सोनू त्या दुकानदाराचे नाव विचारत आहे. त्यावेळी दुकानवाला त्याचं नाव अक्षय असल्याचं सांगत आहे. त्याचवेळी त्याच्या बाजूला असलेला एक व्यक्ती तोंडात गुटखा खात असल्याचं दिसतं आहे. त्यावेळी सोनू म्हणतोय, ‘गुटका क्यों खाता है बे, जा फैंक कर आ’. त्यानंतर ती व्यक्ती त्याचं ऐकते आणि गुटखा कधीही खाणार नाही असं आश्वासन देते.

आतापर्यंत सोनू सूदच्या त्या व्हायरल व्हि़डीओला चार लाख लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर चांगल्या कमेंट सुध्दा केल्या आहेत.