जंगलात दडलेलं हरीण शोधा, हुशारांच्या यादीत स्थान मिळवा!
या फोटोमध्ये तुम्हाला एक जंगल दिसेल. इतक्या झाडा-झुडपांमध्ये एक हरीणही लपलेलं आहे.

हल्ली सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन शेअर केले जातात. यातील अनेक भ्रम सोडविताना आपले डोके फिरते कारण आपल्याला लगेच योग्य उत्तर मिळत नाही. आम्ही असाच एक गोंधळात टाकणारा ऑप्टिकल भ्रम लोकांसाठी घेऊन आलोय. हे कोडं सोडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण काहींनाच यात यश मिळालंय. बघुयात तुम्हाला सापडतंय का याचं उत्तर.
या फोटोमध्ये तुम्हाला एक जंगल दिसेल. इतक्या झाडा-झुडपांमध्ये एक हरीणही लपलेलं आहे. या फोटोमध्ये योग्य उत्तर शोधण्यापूर्वी तुमच्या फोनमध्ये 20 सेकंदाचा टायमर सेट करा. हा व्हायरल फोटो सतत पाहिला तर तुम्हाला हरीण दिसेल.
जर तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही, तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या डाव्या भागात हरीण शोधण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्ही आता हरीण पाहिले असेल तर अभिनंदन, तुमचे डोळे खरोखरच तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला योग्य उत्तर मिळालं नसेल तर खालील फोटोत पाहा कुठे हरीण दडलेलं आहे…

Spot the hidden deer
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिलेल्या वेळेत हे कोडं सोडवणारे फार कमी लोक आहेत. हा फोटो (ट्रेंडिंग फोटो) अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की, तुम्हाला प्रथमदर्शनी हरीण दिसणार नाही. ऑप्टिकल भ्रमामुळे अनेकदा सोशल मीडिया यूजर्सची गुंतून राहतात.
