AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teri Aakhya ka Yo Kajal : काकांचा डान्सपासून लोक झाले पागल….! सपना चौधरीही म्हणेल, ‘भारीएत हे काका’

Man dancing of Teri Aakhya ka yo Kajal Sapna Chaudhari Song : सपना चौधरीच्या तेरी आख्या का यो कायल (Teri Aakhya ka yo Kajal song of Sapna Chaudhary) गाण्यावर ठेका लगावणं, वेस्ट इंडियन बॅट्समन क्रिस गेललाही आवरता आलं नव्हतं.

Teri Aakhya ka Yo Kajal : काकांचा डान्सपासून लोक झाले पागल....! सपना चौधरीही म्हणेल, 'भारीएत हे काका'
हा व्हायरल डान्स तुम्हीही पाहून घ्या..Image Credit source: instagram
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Apr 15, 2022 | 12:28 PM
Share

डान्स (Dance) हा शब्द बोलायला जेवढा सोपा, तेवढाच तो करायला कठीण! नाचण्यासाठी पण हिम्मत लागते. टॅलेंट लागतं. ऐऱ्यागैऱ्याचं ते कामच नाही. सोशल मीडियात असे नवनवे डान्सचे हटके व्हिडीओ समोर येत असतात. व्हायरल (Dance viral video)झालेल्या डान्सिंग अन्कलची गोष्ट तर तुम्हाला माहीत आहेच. पण आता आणखी एक काकांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झालेलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीये. काकांचा डान्स विनोदी तर आहेच, पण भारीही आहे. सपना चौधरीच्या तेरी आख्या का यो कायल (Teri Aakhya ka yo Kajal song of Sapna Chaudhary) गाण्यावर ठेका लगावणं, वेस्ट इंडियन बॅट्समन क्रिस गेललाही आवरता आलं नव्हतं. आणि आता जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात तर हे काका टिपीकल देसी आहेत. त्यांच्या देसी स्टेप्स सगळ्यांनाच आनंद देतायत. त्यांनी केलेला डान्स पाहून स्टेजवरचेही आपल्या स्टेप्स विसरले होते. प्रेक्षकांना तर हसून हसून घायाळ झाले होते. प्रेक्षकांपैकी एकानं या काकांचा एक व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. सोशल मीडियावर पोस्ट केला. आणि आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

कॉमेडियनकडून कॉमेडी व्हिडीओ शेअर

कॉमेजियन सुनील ग्रोवरनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. खुद्द सपना चौधरीही हा व्हिडीओ पाहून रिएक्ट झाली आहे. सुनील ग्रोवरनं शेअर केलेल्या व्हिडीओवर सुपनानं कमेंट केली आहे. एकदा हा व्हिडीओ पाहून मन भरत नाहीये. सारखं सारखं हा डान्स पाहण्याचं मन करतंय, असं कॉमेडियन सुनील ग्रोवरनं म्हटलंय.

असं काय आहे खास डान्समध्ये?

खरंतर एका कोणत्यातरी कार्यक्रमातला हा डान्स आहे. एका गाण्यावर खराखुरा परफॉर्मन्स सुरु असतो. मात्र एक व्यक्ती स्टेजवर येऊन नाचू लागतो. या व्यक्तीचा डान्स इतर परफॉर्मरवर भारी पडतो. सगळ्यांचं लक्ष ही एकटी व्यक्ती वेधून घेते. चित्र-विचित्र गावराण स्टेप्स हा व्यक्ती सपना चौधरीच्या गाण्यावर करताना दिसतो.

हा स्टेप्स इतक्या विनोदी असतात, की व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यालाही हसू आवरत नाही. अवघ्या 29 सेकंदाच्या या व्हिडीओनं सध्या सगळ्यांना पोटभर हसवलंय. एकहा हा व्हिडीओ पाहाच..

पाहा Video : वरुन ग्रोवरनं शेअर केलेला खास डान्स

संबंधित बातम्या :

निळ्या ड्रेसमध्ये सपना चौधरीचा धमाकेदार डान्स, चाहते घायाळ

Sunil Grover : कॉमेडीचा बादशाह पुन्हा स्टेजवर, हृदय शस्त्रक्रियेनंतर सुनील ग्रोव्हरचा पहिला लाइव्ह कार्यक्रम

Sunil Grover : शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सुनील ग्रोव्हर कॅमेऱ्यासमोर, तब्येतीविषयी म्हणाला…

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार