
थायलंडची ब्यूटी क्वीन सुहान्नी नोइनोनथॉंगला (Suphannee Noinonthong) एका दिवसात थाई ब्यूटी क्वीनचा मुकुट गमवावा लागला आहे. यामागचे कारण म्हणजे तिचा ऑनलाइन व्हायरल झालेला अश्लील व्हिडीओ. सुहान्नी ही “बेबी” या नावाने ओळखली जाते. तिने 20 सप्टेंबर रोजी मिस ग्रँड प्राचुआप खिरी खान 2026 (Miss Grand Prachuap Khiri Khan 2026)चा किताब जिंकला होता. त्यामुळे तिला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली होती. पण त्यापूर्वीच सोशल मीडियावर तिचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आणि सर्व काही बदलले.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुहान्नी सेक्स टॉयचा वापर करताना आणि ई-सिगरेट ओढताना दिसत आहे. व्हिडीओत (Miss Grand Thailand X-rated video) तिने गुलाबी रंगाचा पारदर्शक नाईट ड्रेस घातला होता आणि ती नाचताना दिसत होती. अहवालानुसार, त्यांचे OnlyFans पेज अजूनही सक्रिय आहे.
वाचा: समीर चौघुले गेले, अशी बातमी आली अन्… स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा… नेमकं काय घडलं?
🚨 Suphannee Baby Noinonthong video leak going viral as netizens search for the explicit Suphannee Baby video, a shocking moment linked to the Thai beauty queen from Miss Grand Prachuap Khiri Khan Thailand 👀🔥
🔗 https://t.co/rPqgsra2tb pic.twitter.com/SvD2o0J3TU— Renee Daugherty (@DaughertyR33348) September 23, 2025
आयोजकांनी हिसकावून घेतला मुकुट
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे 21 सप्टेंबर रोजी मिस ग्रँड थायलंड पेजेंट समितीने सुहान्नीचा मुकुट हिसकावून घेतला आहे (Thai pageant title stripped). समितीच्या निवेदनानुसार, “सध्याच्या मिस ग्रँड प्राचुआप खिरी खान 2026 ने काही अशी कृत्ये केली, जी स्पर्धेच्या भावने आणि मूल्यांना शोभतील अशी नाहीत.”
सुहान्नीचे काय म्हणणे आहे?
सुहान्नीने मान्य केले की तिने अश्लील कंटेंट तयार केला होता. तिने पुढे हेही सांगितले की, तिने हे पाऊल स्वतःच्या आणि तिच्या आजारी आईच्या आधारासाठी उचलले होते, जी आता हयात नाही. फेसबुक पोस्टमध्ये ती म्हणाली की, “मी माझ्या कुटुंबाला, स्पर्धा व्यवस्थापक, स्पर्धा टीम, इतर स्पर्धक, मित्र आणि सर्व समर्थकांची माफी मागते. ही घटना माझ्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे, ज्यामुळे मी प्रत्येक कामाची जबाबदारी समजून घेईन आणि भविष्यात स्वतःमध्ये सुधारणा करेन जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.”