INS Vikrant: “समुद्रात तरंगणारा किल्ला” मोदींकडून INS Vikrant चं कौतुक! नेटिझन्स म्हणे, “यु ब्युटी”

कोचीन शिपयार्ड मध्ये तयार करण्यात आलेली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 20 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलीये. दरम्यान, ट्विटरवर #INSVikrant (#INSVikrant) हा हॅशटॅग टॉप ट्रेंड मध्ये आहे. नेटीझन्स त्यांच्याच स्टाईलमध्ये आनंद व्यक्त करत आहेत.

INS Vikrant: समुद्रात तरंगणारा किल्ला मोदींकडून INS Vikrant चं कौतुक! नेटिझन्स म्हणे, यु ब्युटी
INS Vikrant
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 02, 2022 | 2:58 PM

2 सप्टेंबर हा भारतीय नौदलासाठी (Indian Navy) अत्यंत खास दिवस आहे. देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात दाखल झाली आहे. भारताच्या सागरी इतिहासाची ही ‘बाहुबली’ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी एका कार्यक्रमात राष्ट्राला अर्पण केली. पीएम मोदी म्हणाले – ही केवळ युद्धनौका नाही, तर समुद्रात तरंगते शहर आहे. कोचीन शिपयार्ड मध्ये तयार करण्यात आलेली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 20 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलीये. दरम्यान, ट्विटरवर #INSVikrant (#INSVikrant) हा हॅशटॅग टॉप ट्रेंड मध्ये आहे. नेटीझन्स त्यांच्याच स्टाईलमध्ये आनंद व्यक्त करत आहेत.

लोक म्हणतात – The Legend is back.

पंतप्रधान मोदी यांनी विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या अभियंत्यांचे कौतुक केले आणि म्हटले की, जहाजात वापरल्या जाणाऱ्या सर्व केबल्स आणि वायर कोचीहून काशीला पोहोचू शकतात.

हा एक समुद्रात तरंगता किल्ला आहे असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन उपस्थित होते.

दरम्यान, ट्विटरवर लोक #INSVikrant हॅशटॅगद्वारे आनंद व्यक्त करत आहेत. लोकं #INSVikrant ला सोशल मीडियावर चांगलंच सेलिब्रेट करतायत.

People are celebrating #INSVikrant well on social media

 

सुदर्शन पटनाईक यांनी वाळूवर आयएनएस विक्रांतची आकृती रेखाटली