video | टोमॅटोच्या मध्यभागी बसला होता साप, अचानक हल्ला केल्यानंतर…, पाहा व्हिडीओ

Viral video | सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये टोमॅटो दिसत आहेत. त्याच्यात एक नाग दिसला बसला आहे.

video | टोमॅटोच्या मध्यभागी बसला होता साप, अचानक हल्ला केल्यानंतर..., पाहा व्हिडीओ
viral snake video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2023 | 2:34 PM

मुंबई : सध्या टोमॅटोच्या (tomato hike) किमती गगनाला भिडल्या आहेत. देशातल्या अनेक मेट्रो शहरात दीडशे ते दोनशे रुपये टोमॅटोचे भाव (tomato rate increased) झाले आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर काही मिम्स सुध्दा शेअर झाले आहेत. सामान्य लोकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. सगळीकडं टोमॅटोची चर्चा देखील ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही दुकानदारांनी नवी स्कीम सुरु केली आहे. एक मोबाईल खरेदी केल्यानंतर टोमॅटो फुकट देत आहेत. सध्या जो व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) झाला आहे. त्यामध्ये टोमॅटोमध्ये एक साप बसला आहे. त्याने सापाने सगळ्यांना हैराण केलं आहे. तो साप टोमॅटोची सुरक्षा करीत आहे.

टोमॅटो खजिन्यापेक्षा कमी नाही

लोकांना धक्का देणाऱ्या त्या व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ तयार केला आहे, त्याने लिहिलं आहे की, टोमॅटो खजिन्यापेक्षा कमी नाही, एक साप टोमॅटोचं रक्षण करीत आहे. व्हायरल व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाच्या लक्षात येईल, तो साप तिथ असलेल्या वस्तूचं रक्षण करीत आहे. ज्यावेळी एक व्यक्ती ते टोमॅटो घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी तो साप हल्ला करीत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. याचं कारणामुळे तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले जातात. चांगले व्हिडीओ रोज लोक शोधत असतात. त्याचबरोबर पाहून झाल्यावर त्यावर कमेंट करतात. त्याचबरोबर शेअर सुध्दा करतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज पाहायला मिळतात. सध्याचा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे.