VIDEO | चिमुरडीने हरणाला प्रेमाने खाऊ दिला, मग हरणाने सुध्दा चिमुरडीला इशारा केला, भोळेपणा पाहून लोक भारावले

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका चिमुकलीने हरणाला प्रेमाने खाऊ दिलं आहे. त्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

VIDEO | चिमुरडीने हरणाला प्रेमाने खाऊ दिला, मग हरणाने सुध्दा चिमुरडीला इशारा केला, भोळेपणा पाहून लोक भारावले
ANIMAL VIRAL VIDEO
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 25, 2023 | 11:32 AM

मुंबई : सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) प्राण्यांचे अनेक व्हिडीओ (ANIMAL VIRAL VIDEO) पाहिले जातात. काही लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ इतके आवडतात की लोकं ते व्हिडीओ शोधत असतात. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती काही प्राण्यांचे व्हिडीओ चांगलेचं व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओ प्राण्यांचे खेळताना दिसत आहेत. तर काही व्हिडीओ भांडण सुरु असल्याचे पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. सध्याचा व्हिडीओ एका चिमुकलीचा आणि हरणाचा (DEER) आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर अजून व्हायरल होईल असं अनेकांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ फक्त १० सेंकदाचा आहे. एक चिमुकली आपल्या हाताने हरणाला खायला देत आहे.

चिमुकली सुध्दा पुन्हा हरणाला खायला देत आहे

The Figen यांच्याकडून हा व्हिडीओ ट्विटरवरती शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली छोट्या शिंगांच्या हरणाला सम्मानपूर्वक झुकवल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर चिमुकली ज्या पद्धतीने आपली मान हालवत आहे. त्याचबरोबर हरण सुध्दा मान हलवत आहे. चिमुकली सुध्दा पुन्हा हरणाला खायला देत आहे, आणि पुढे सरकत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, दोन निष्पाप एकचं भाषा ओळखत आहे.

व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अधिक साऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकं ही जोडी पाहून अधिक हसत आहेत. काही लोकं म्हणत आहे की, इंटरनेटवरती अशा व्हिडीओला अधिक जागा आहे. एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, प्राण्यांसाठी ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. एक ट्विटर युझरने लिहीलं आहे की, ‘दोन प्रिय दोस्त, मी त्यांना कायम पाहू शकतो.