विमानात नृत्य करताना युवतीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया

एका युवतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विमानात शाहीद कपूरच्या विवाह चित्रपटातील गाणं गात डान्स करत आहे.

विमानात नृत्य करताना युवतीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया
Govinda Hatwar | Updated on: May 10, 2023 | 8:50 PM

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोनंतर आता विमानात युवती डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युवती तिकीट हातात घेऊन विमानात चढली. सीटवर जाण्यापूर्वी ती डान्स करू लागली. युवतीने छोटासा ड्रेस परिधान केला आहे. ही युवती शाहीद कपूरच्या विवाह चित्रपटातील मीलन की जल्दी है, या गाण्यावर डान्स करत आहे. युवतीच्या या करामतीमुळे सर्व प्रवाशांची नजर तिच्यावर होती. एका युवतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विमानात शाहीद कपूरच्या विवाह चित्रपटातील गाणं गात डान्स करत आहे.

कमेंट्स पाऊस

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला इंस्टाग्रामवर @Shibakhan नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आले. हा व्हिडीओ पाहून लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही लोकांना युवतीचा डान्स पसंत आला. या व्हिडीओला एक कोटी ३० लाख लोकांहून जास्त जणांनी बघीतलं. पाच लाख लोकांपेक्षा जास्त जणांनी लाईक केलं.

दिल्ली मेट्रो बनवू नको

काही युजर्स हा व्हिडीओ पाहून भडकले. एक म्हणाले, दीदी प्लीज आता याला दिल्ली मेट्रो बनवू नको. दुसरा युजर्स म्हणाला, असं वाटतं पहिल्यांदा विमानात बसली असेल. अशाप्रकारे कित्तेक लोकांनी चांगले-वाईट कमेंट्स केले. हा व्हिडीओ पाहून काही लोकं तिच्यावर भडकले आणि तिला ट्रोल केलं.

गाण्याला मोठी पसंती

मीलन ही जल्दी हैं. प्रेम ही धिमी हैं रफ्तार, मेरा बस जले तो मैं.. अशा प्रकारचं गाण बॅगग्राऊंडला आहे. त्या गाण्यात ती नाचत आहे. तीचं हे नृत्य प्रवासी पाहत आहेत. या गाण्याला पसंती मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. त्यामुळे तीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us