Video: लहान बहिण सायकलवरून खाली पडू नये, म्हणून भावाने केलेली आयडीया लोकांच्या पसंतीला

Video: लहान बहीण सायकलवर खाली पडू नये, म्हणून भावाने केली आयडिया, व्हिडिओ पाहून डोळे भरून येतील

Video: लहान बहिण सायकलवरून खाली पडू नये, म्हणून भावाने केलेली आयडीया लोकांच्या पसंतीला
लहान बहीण सायकलवर खाली पडू नये, म्हणून भावाने केली आयडिया
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 04, 2023 | 3:41 PM

मुंबई: बहिणीसाठी भाऊ किती काळजी घेतो, त्याचा एक व्हिडीओ (viral video) सोशल मीडियावर (social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ लोकांच्या इतका पसंत पडला आहे की, लोकांनी कमेंटमध्ये (comment) करुन भावाचं कौतुक केलं आहे. व्हिडीओला लोकांनी वारंवार पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे भरून आले आहेत.

नॉवेल्स नामक या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुळात हा व्हिडीओ 22 सेंकदाचा आहे. त्या व्हिडीओमध्ये भावाने बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी एक आयडिया केली आहे. चिमुकलीचे पाय बांधले आहेत, त्यानंतर व्यवस्थित आहे पाहिलं, लगेच त्यांचा प्रवास सुरु झाला.

“भाई का प्यार.” असं कॅप्शन ट्विटरवरती लिहिलं आहे. हा व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे.