AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP: प्रेयसीसह पळून गेलेल्या मुलाला मुलीच्या आई-वडिलांनी घरी बोलावलं, नंतर संपुर्ण परिसर हादरला

प्रेयसीसह फरार झालेल्या मुलाला समजवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, कोल्ड्रिंक पाजून नको ती अवस्था...

UP: प्रेयसीसह पळून गेलेल्या मुलाला मुलीच्या आई-वडिलांनी घरी बोलावलं, नंतर संपुर्ण परिसर हादरला
CRIME NEWS
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 04, 2023 | 2:55 PM
Share

उत्तर प्रदेश : राज्यात क्राईमच्या (Crime News) रोज नव्या घटना उजेडात येत असतात. मेरठच्या (Merath)मवानामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण परिसर हादरून गेला आहे. दोन दिवसापुर्वी प्रेयसीसह तरुण पळून गेला होता. मुलीच्या घरच्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये (UP police) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर समजवण्याच्या बहाण्याने त्याला घरी बोलावण्यातं आलं. समजवत असताना मुलीच्या घरच्यांनी कोल्ड्रिंक पाजून मुलाला संपवले.

कोल्ड्रिंकमधून मुलीच्या घरच्यांनी मुलाला विष पाजलं. त्याचबरोबर त्याची प्रकृती ज्यावेळी अति बिघडली त्यावेळी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.

मोहल्ला कल्याण सिंह निवासी शाकिब पळून गेलेल्या मुलाचं नाव आहे. दोन दिवसापूर्वी तो त्यांच्या परिसरातील प्रेयसीला घेऊन फरार झाला होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मुलीच्या घरच्यांनी मुलाला विविध आश्वासने देऊन घरी बोलावलं.

ज्यावेळी तो मुलगा प्रेयसीला घेऊन घरी आला, त्यावेळी त्याला मुलीच्या घरच्यांनी कोल्ड्रिंक प्यायला दिलं. त्यामध्ये विष टाकण्यात आलं होतं. त्यानंतर त्या मुलाला मेरठच्या अर्जुन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रात्री उशिरा त्या तरुणाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून कसून चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा