VIDEO | रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला, पोलीस हवालदार जखमी वृद्ध महिलेला हातात उचलून घेत रुग्णालयात पोहोचला, नेटकरी म्हणाले

सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक महिला आपल्या पतीला भेटायला निघाली होती. त्यावेळी त्या महिलेचा अपघात झाल्याची माहिती समजली आहे.

VIDEO | रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला, पोलीस हवालदार जखमी वृद्ध महिलेला हातात उचलून घेत रुग्णालयात पोहोचला, नेटकरी म्हणाले
police viral news in marathi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2023 | 1:43 PM

मुंबई : मुंबई पोलिसांची (Mumbai Police constable) देशात चर्चा केली जाते. कारण एखाद्या गोष्टीचा छडा लावण्यात ते मागू राहू शकत नाहीत असं अनेकदा झालं आहे. सध्या एका मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सगळी लोकं त्या पोलिस कर्मचाऱ्याचं तोंडभरून कौतुक करीत आहेत. एका वयोवृध्द महिलेला (elderly woman) त्या कर्मचाऱ्याने हाताने उचलून हॉस्पीटलमध्ये नेले आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्याने त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचं नाव संदीप वाकचौरे (constable Sandeep Vakchaure) असं आहे. रुग्णवाहिका उशीरा आल्यामुळे त्या पोलिस कर्मचारी त्या वयोवृध्द व्यक्तीला हातातून घेवून गेला आहे.

दोन वाहनांनी त्यांना धडक दिल्यामुळे…

त्या महिलेचं वय 62 आहे. ज्यावेळी ती महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. दोन वाहनांनी त्यांना धडक दिल्यामुळे त्या जागीचं कोसळल्या होत्या. त्यावेळी तिथं ड्यूटीवरती असलेले संदीप वाकचौरे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

कर्मचाऱ्याच्या चांगल्या कामगिरीमुळे…

मुंबई पोलिसांच्या ट्विटनुसार, दोन दिवसापूर्वी एक वयोवृध्द महिला आपल्या पत्नीला भेटण्यासाठी निघाली होती. त्यावेळी त्या महिलेला दोन वाहनांनी धडक दिली. त्यावेळी तिथं संदीप वाकचौरे ड्युटीवर होते. रुग्णवाहिका येण्यास उशिर झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या हातात त्या महिलेला घेतलं आणि हॉस्पिटल गाठलं असल्याचं सांगितलं आहे. कर्मचाऱ्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचा जीव वाचला आहे.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक, एकजण म्हणाला आहे की, संदीप वाकचौरे यांना माझा सलाम आहे. दुसरा नेटकरी म्हणत आहे की, चांगलं काम केलं आहेस. तिसरा नेटकरी म्हणत आहे की, तुम्ही खूप महान आहात. चौथा नेटकरी म्हणतो कर्मचाऱ्याने वेळेत त्या व्यक्तीला पोहचवल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला आहे.