नोटबंदी, 2G घोटाळा सगळ्यावर बोलले! रिक्षावाल्या दादांचं जनरल नॉलेज कमाल!

| Updated on: Dec 02, 2022 | 5:05 PM

यानंतर युरोपीय खंडातील सर्व ४४ देशांची नावे त्याने तातडीने सांगितली. चला तर मग पाहूया हा व्हिडिओ.

नोटबंदी, 2G घोटाळा सगळ्यावर बोलले! रिक्षावाल्या दादांचं जनरल नॉलेज कमाल!
General knowledge of auto driver
Image Credit source: Social Media
Follow us on

एक व्हिडीओ व्हायरल झालाय, राजीव कृष्णा हा इन्स्टाग्राम वापरकर्ता मुंबईत तासभर ट्रॅफिकमध्ये अडकला होता, तेव्हा त्याने आपल्या ऑटो ड्रायव्हरसोबत एक अविस्मरणीय प्रवास केला. राजीव कृष्णा यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘मी मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो होतो. शेवटचे ३ किमीचे अंतर पार करण्यासाठी सुमारे एक तास लागेल, असे गुगल मॅप्स सांगत होते. मला वाटले की मी ऑटो सोडून पायीच निघावे. पण ड्रायव्हरला माझी मनःस्थिती जाणवली आणि तो गोंधळून गेला.

राजीव पुढे म्हणतो की, यानंतर ड्रायव्हरने त्याला विचारले की, तो कोणत्या देशात गेला आहे. त्यावर राजीव यांनीही खिल्ली उडवत काही ठिकाणची नावं सांगितली.

पण यानंतर ड्रायव्हरने ज्या गोष्टी सुरू केल्या, त्याची कल्पनाही राजीव यांनी केली नव्हती. त्या-त्या ठिकाणच्या देशांची नावे आपल्याला माहीत असल्याचा दावा वाहनचालकाने केला.

यानंतर युरोपीय खंडातील सर्व ४४ देशांची नावे त्याने तातडीने सांगितली. चला तर मग पाहूया हा व्हिडिओ.

व्हिडिओमध्ये तुम्ही ड्रायव्हरला वेगवेगळ्या खंडातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांची नावं सांगतानाही ऐकू शकता. हा ऑटोचालक महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचा रहिवासी असून, त्याने आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवली आहेत.

तासाभरात ड्रायव्हरने राजीव यांच्याशी नोटबंदी, टू जी घोटाळा आणि पनामा पेपर्स या विषयांवरही चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आता अधिकाधिक व्हायरल होत आहे. शेअर केल्यापासून आतापर्यंत 38 हजार वेळा लाईक केले गेले आहे.

त्याचबरोबर अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकाने लिहिले, “राजीव, तू ज्या प्रकारे ही गोष्ट सांगितलीस, ती खूप छान होती. त्याचवेळी आणखी एक युझर म्हणतो, “राजीव, हा व्हिडिओ आणि तुझं कॅप्शन या दोन्ही गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून गेल्या.” आणखी एका युझरने लिहिले की, “मुंबई आणि तिथले लोक दोघेही सरप्राईज पॅकेज आहेत.”