ऐकावे ते नवलच ! येथे पैसे देऊन लोक गाडून घेतात, कारण काय?

| Updated on: Oct 28, 2022 | 11:32 PM

या थेरेपीमध्ये व्यक्तीला स्वतःला जमिनीखाली जिवंत गाडून घ्यावे लागते. या थेरेपीसाठी खूप पैसे आकारले जातात. रशियातील एका कंपनीने ही विचित्र थेरेपी सुरु केली आहे.

ऐकावे ते नवलच ! येथे पैसे देऊन लोक गाडून घेतात, कारण काय?
येथे जिवंत गाडतात लोकांना
Image Credit source: social
Follow us on

जगात काय घडेल ते सांगू शकत नाही. प्रत्येक कंपनीच्या आपल्या कामाकाजाच्या काही पॉलिसी असतात. काही पॉलिसी जाचक असतात तर काही विचित्र असतात. अशीच एक अजब थेरेपी एका कंपनीने सुरु केली आहे. या थेरेपीमध्ये व्यक्तीला स्वतःला जमिनीखाली जिवंत गाडून घ्यावे लागते. या थेरेपीसाठी खूप पैसे आकारले जातात. रशियातील एका कंपनीने ही विचित्र थेरेपी सुरु केली आहे.

रशियातील प्रिकेटेड कंपनीने ही विचित्र थेरेपी सुरु केली आहे. चिंताग्रस्त लोकांना या थेरेपीचा लाभ होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या थेरेपीसाठी तब्बल 47 लाख रुपये आकारले जातात.

काय आहे प्रकरण?

या थेरेपीमध्ये व्यक्तीला संगीत ऐकण्याची संधी मिळते, मेणबत्त्या लावल्या जातात आणि इच्छापत्र लिहिण्याचीही संधी मिळते. या थेरेपीची ऑनलाईन आवृत्तीही उपलब्ध आहे. इच्छुकांना यासाठी 12 लाख रुपये भरावे लागतात.

हे सुद्धा वाचा

याची स्थापना Yakaterina Preobrazhenskaya यांनी केली आहे. अंत्यसंस्कार पॅकेज अंतर्गत, लोकांना भीती आणि चिंता दूर करण्यासाठी मदत केली जाते. कंपनीने सांगितले की, ऑनलाइन पॅकेजच्या माध्यमातून लोकांना भीती आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी ‘स्ट्रेस थेरपी’ दिली जाते.

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, Yakaterina Preobrazhenskaya यांनी या प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन केले आहे. जिवंत दफन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना विनाकारण संकटात टाकत नाही, असे Yakaterina Preobrazhenskaya यांनी स्पष्ट केले आहे.

या थेरपीसाठी बरेच लोक संपर्क करतात, परंतु प्रत्येकजण ही थेरपी घेऊ शकत नाही. आम्ही लोकांना इतर अनेक पर्याय देखील देतो, तो ते त्यांच्या इच्छेनुसार निवडू शकतात.

20-60 मिनिटे जमिनीखाली गाडले जाते

या प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला 20 ते 60 मिनिटे जमिनीखाली दफन रहावे लागते, असे अहवालात सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, शवपेटी देखील ग्राहकांना परत केली जाते.