
तुम्ही जर उत्सुक इन्स्टाग्राम युजर असाल, तर कदाचित तुम्हाला लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’वर नाचणाऱ्या मुलीचा व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळाला असेल. या व्हिडिओने इंटरनेटला आग लावली आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील असून व्हिडिओतील मुलीचे नाव आयेशा असे आहे. हा व्हिडिओ एका लग्नाच्या कार्यक्रमातील असल्याचे दिसून येतंय. या व्हिडिओवर लोकांनी
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आयेशा लूज-फिट कुर्ता आणि पँट घालून गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
तिच्या बारीकसारीक, तसेच कामुक अभिनयाने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. सदाबहार लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर ही मुलगी थिरकताना दिसत आहे.
तिच्या आजूबाजूला इतर अनेक महिला आहेत. हा कुठल्यातरी लग्नाचा कार्यक्रम वाटतो. आयशाने तिच्या हातात एक प्रकारचा कलिरा घातलाय त्यामुळे कदाचित हे तिचंच लग्न असू शकतं असा सगळे तर्क लावतायत.
हा व्हिडिओ सुरुवातीला टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता, तर नंतर तो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला होता.
“माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मला फरक पडत नाही की लोक काय म्हणतील, त्यामुळे कोणत्याही वाईट कमेंट्स करू नका” असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
आयेशाने केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही नेटिझन्सची मने जिंकली आहेत याचा पुरावा म्हणजे कमेंट्स. लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहू शकले नाही.