Smartphone Battery : फोन सेटिंगमध्ये करा फक्त 5 बदल, बॅटरीचं टेन्शन होईल छूमंतर !

Smartphone Battery : तुमचाही मोबाईल, स्मार्टफोन लवकर डिस्चार्ज होतो का? तुमच्या फोनची बॅटरी लाइफ अनेक पटींनी वाढवण्यासाठी आणि बॅटरीचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही साधे सोपे 5 उपाय करू शकता.

Smartphone Battery : फोन सेटिंगमध्ये करा फक्त 5 बदल, बॅटरीचं टेन्शन होईल छूमंतर !
फोनची बॅटरी लवकर संत असेल तर हे उपया नक्की करा
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Aug 25, 2025 | 1:42 PM

लहान मुलं असोत की मोठी माणसं, आजकाल सर्वांच्या हातात मोबाईल, स्मार्टफोन दिसतो. त्याचा वापर प्रचंड वाढला आहे, पण मोबाईलची बॅटरी, ही देखील लोकांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. पूर्वी कीपॅड फोन चार्जिंगशिवाय 2-3३ दिवस चालू शकत होते, पण आता स्मार्टफोनची बॅटरी अवघी एक दिवसही टिकत नाहीत. पण ते प्रत्येकाच्या वापरानुसार ठरतं.

तुम्हालाही हा त्रास सतावतो का, पण टेन्शन घेऊ नका. तुम्या फोनच्या सेटिंगमध्ये काही सोपे बदल केलेत, तर तुमच्याही फोनची बॅटरी बराच काळ चालू शकते.

ऑलवेज-ऑन डिस्प्ले करा बंद

जेव्हा फोन लॉक केलेला असतो आणि स्क्रीनवर वेळ किंवा नोटिफिकेशन दिसतात, तेव्हा तो ऑलवेज-ऑन डिस्प्ले असतो. हे फीचर बॅटरी लवकर संपवते. ते दर तासाला 1 ते 2 टक्के बॅटरी वापरू शकते. त्यामुळे ऑलवेज ऑन डिस्प्ले बंद करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा, डिस्प्ले/लॉक स्क्रीन पर्यायावर क्लिक करा. यानंतर, ऑलवेज-ऑन डिस्प्लेचा टॉगल बंद करा.

डार्क मोड करा ऑन

डार्क मोड चालू केल्याने, फोनची स्क्रीन कमी प्रकाश वापरते आणि बॅटरी जास्त काळ टिकते. ते चालू करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा आणि डिस्प्लेवर क्लिक करा. यानंतर, थीम पर्यायांमध्ये डार्क मोड चालू करा.

स्क्रीनचा ब्राइटनेस आणि स्लीप टाइम करा कमी

ब्राइटनेस नेहमी मीडिअम किंवा ऑटोवर ठेवा. स्लीप टाइम (जेव्हा फोन स्क्रीन स्वतः बंद करतो) जास्त वेळ ठेवू नका. तुम्ही ती वेळ 15 ते 30 सेकंदांच्या दरम्यान सेट करू शकता.

अडॅप्टिव्ह बॅटरी मोड करा ऑन

अँड्रॉईड फोनमध्ये अडॅप्टिव्ह बॅटरी नावाच फीचर असते. बॅटरी वाचवण्यासाठी ते फीचर फोनचा परफॉर्मन्स ॲडजस्ट करतं. ते चालू करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा, बॅटरीवर क्लिक करा. ॲडॉप्टिव्ह प्रेफरन्सेसमध्ये ॲडॉप्टिव्ह बॅटरी चालू करा.

बॅटरी सेव्हर मोड ऑन करा

बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या ॲप्स नियंत्रित करतं. फोनच्या परफॉर्मन्सला बॅलन्स करतं,त्यामुळे बॅटरी जास्त काळ टिकते. अनेक स्मार्टफोनमध्ये, ते Extreme Battery Saver या नावाखाली सेटिंग्जमध्ये देखील दिले जाते.