एकाच जागी दोन रेल्वे स्टेशन, ट्रेन पकडणारे गोंधळून जातात

भारतीय रेल्वेवर एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानके असल्याने प्रवाशांचा गोंधळ होत असतो. कुठे आहेत ही अजब स्थानके !

एकाच जागी दोन रेल्वे स्टेशन, ट्रेन पकडणारे गोंधळून जातात
railway
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 24, 2023 | 11:17 AM

मुंबई : भारतीय रेल्वे एक चमत्कार आहे. या रेल्वेन दररोज अडीच कोटी लोक प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वेचे ( INDIANRAILWAY ) जाळे जगभरातील चौथे मोठे नेटवर्क ( NETWORK )  मानले जाते. तसेच रेल्वे सैन्यानंतर चोवीस तास काम करणारी संस्था आहे. रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकांचा पुनर्विकास होऊन विमानतळासारखी रेल्वे स्थानके चकाचक होत आहेत. भारतीय रेल्वेवर लोक पीएचडी करीत असतात. अशा रेल्वेच्या काही चमत्कारांपैकी एक चमत्कार पाहूया…

एकाच जागी दोन वेगळी स्थानके …

आज आपण भारतीय रेल्वेचा स्थानकांबाबतचा आगळा वेगळा विक्रम. भारतीय रेल्वेत एकमेकांच्या बाजूला दोन वेगवेगळ्या नावांची स्थानके आहेत. हे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय ? या दोन स्थानकादरम्यान केवळ एका रूळांचे अंतर आहे. जेव्हा प्रवासी या रेल्वे स्थानकांवर उतरतात, तेव्हा दोन वेगवेगळ्या राज्याचे साईन बोर्ड पाहून गोंधळून जातात. त्यांना आपण योग्य जागीच आलोय ना याची खातरजमा करावी लागते. एकाच जागी दोन वेगवेगळी स्थानके का बांधली आहेत. याबाबत कोणालाच काही नीट माहिती नाही आहे ना कमाल…

पहिल्यांदा येणारे प्रवासी गोंधळून जातात…

येथे आपण महाराष्ट्रातील या दोन स्थानकाबद्दल बोलत आहोत,ही दोन स्थानके अहमदनगर जिल्ह्यात मोडतात. या दोन स्थानकापैकी एकाचे नाव आहे श्रीरामपूर रेल्वे स्टेशन आणि बेसापूर रेल्वे स्टेशन. या दोन रेल्वे स्थानका दरम्यान केवळ एका रूळांचे अंतर आहे. जे लोक दररोज प्रवास करीत असतात, त्यांच्यासाठी ही गोष्ट वेगळी नाही. त्यांना यात काही वेगळे वाटत नाही. परंतू जे लोक प्रथमच येथून प्रवास करतात यांचे मात्र डोके भंडावून जाते. एकाच ठीकाणी वेगवेगळे स्थानके पाहून..

या ठिकाणाहून अनेक ट्रेनचा प्रवास होत असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक येथून रोज प्रवास करीत असतात. तेव्हा लोकांना समजत नाही की या ठिकाणी उभे कुठे रहायचे, म्हणजे कोणत्या स्थानकावर नेमके गाडी पकडायची …या गोंधळात अनेक लोकांना त्यांना ट्रेन पकडता येत नाहीत. त्यांच्या ट्रेन मिस होत असतात. बेलापूर रेल्वे स्टेशन शिर्डी स्टेशनपासून केवळ 37 किमीवर आहे. हे एक छोटेसे स्टेशन आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या नेटवर्कवर आहे. या स्थानकात एक नॉन एसी रिटायरिंग रूम देखील आहे.