Viral Video: उदयनराजेंचं काळीज कसं? मोट्टं,मोट्टं,लै मोट्टं! गाडी थांबवली आणि…वाह!

| Updated on: May 30, 2022 | 1:32 PM

अनेकदा त्यांचे लोकांना मदत करतानाचे व्हिडीओ वायरल झाले आहेत. पब्लिसिटी स्टंट म्हणून नाही, त्यांचे व्हिडीओज रस्त्यावरचे लोकं काढतात आणि ते वायरल होत राहतात. पण दरवेळी हे होत राहतं पुन्हा उदयनराजे कुणालातरी शक्य तितकी मदत करतात, पुन्हा त्यांचा व्हिडीओ वायरल होतो आणि पुन्हा पुन्हा ते चर्चेत येत राहतात.

Viral Video: उदयनराजेंचं काळीज कसं? मोट्टं,मोट्टं,लै मोट्टं! गाडी थांबवली आणि...वाह!
खासदार उदयनराजे भोसले
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

सातारा: खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. अहो नुसते चर्चेत काय त्यांचे कायमच व्हिडीओ वायरल (Viral Video) होत असतात. कधी डायलॉगबाजी, कधी डान्स, कधी काय तर कधी काय…राजकारणी माणूस (Politician), एका राजघराण्याचा माणूस आणि लोकांच्या मनावर राज करणारा माणूस या सगळ्या वेगवेगळ्या बाजू सांभाळताना खासदार उदयनराजे भोसले चांगला माणूस व्हायला विसरत नाहीत. असं म्हणण्याचं कारणही तसंच आहे. अनेकदा त्यांचे लोकांना मदत करतानाचे व्हिडीओ वायरल झाले आहेत. पब्लिसिटी स्टंट म्हणून नाही, त्यांचे व्हिडीओज रस्त्यावरचे लोकं काढतात आणि ते वायरल होत राहतात. पण दरवेळी हे होत राहतं पुन्हा उदयनराजे कुणालातरी शक्य तितकी मदत करतात, पुन्हा त्यांचा व्हिडीओ वायरल होतो आणि पुन्हा पुन्हा ते चर्चेत येत राहतात. असाच एक व्हिडीओ वायरल झालाय. ज्यात खासदार उदयनराजे एका मुलीला मदत करताना दिसतायत.

उदयनराजेंनी गाडी थांबवली

साताऱ्याच्या रस्त्यावर एक मुलगी रस्त्यावर पुस्तकं विकत होती. उदयनराजेंनी गाडी थांबवली आणि त्या मुलीकडील सर्व पुस्तकं एका दमात विकत घेतली. इतकंच काय पुस्तकं विकत घेतल्यानंतर ती अनाथालयातल्या मुलांना द्यायलाही सांगितली. आता हाच व्हिडीओ वायरल होतोय. लोकांनी अक्षरशः खासदार उदयनराजेंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय. करणारच, त्याला कारणही तसंच आहे. कायमच रस्त्यावरील भिक मागणा-या लहान मुलांकडे पाहून भावुक होणारे उदयनराजे आता सगळ्यांच्या परिचयाचे झालेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हिडीओत?

एका पेट्रोल पंपावर एक लहान मुलगी कॅलेंडर आणि पुस्तकं विकत असते. तिथे खासदार उदयनराजे येतात. त्या मुलीला बघून उदयनराजे भावुक होतात आणि ते त्या मुलीकडे असणारे सगळे कॅलेंडर आणि पुस्तकं विकत घेतात. इतकंच काय तर विकत घेतलेली सगळी पुस्तकं आणि कॅलेंडर ते आपल्या कार्यकर्त्यांना अनाथालयात पाठवायला सांगतात. म्हणजे एक नाही दोन चांगली कामं. एक म्हणजे गरीब मुलीला मदत करून तिची सगळी पुस्तकं कॅलेंडर विकत घेणं आणि दुसरं म्हणजे तीच पुस्तकं अनाथालयातल्या गरजू मुलांना देणं. आता हा व्हिडीओ साताराच काय संपूर्ण महाराष्ट्रात वायरल होतोय. सगळीकडे फक्त खासदार उदयनराजेंच्या दिलदार असण्याचीच चर्चा आहे.