‘चिकन लेग पीस’ वाल्या उल्हास कामटेंचा मृत्यू? हार्ट अटॅक आला? व्हायरल व्हिडीओचं नेमकं सत्य काय?

सोशल मीडियावर 'चिकन लेग पीस' फेम उल्हास कामटे यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाल्याचा व्हायरल व्हिडीओ खोटा ठरला आहे. उल्हास कामटे यांनी स्वतः व्हिडीओद्वारे आपण जिवंत व सुदृढ असल्याचे स्पष्ट केले आहे. एका सिनेमाच्या प्रीमियरदरम्यान आलेल्या एंग्झायटी अटॅकचा तो व्हिडीओ होता, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

चिकन लेग पीस वाल्या उल्हास कामटेंचा मृत्यू? हार्ट अटॅक आला? व्हायरल व्हिडीओचं नेमकं सत्य काय?
Ulhas Kamate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 9:48 PM

सोशल मीडियावर ‘चिकन लेग पीस’चे व्हिडीओ बनवणारे इ्फ्लूएन्सर उल्हास कामटे सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या. गेल्या दोन दिवसांपासून उल्हास कामटे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची अफवा उठली आहे. या अफवांना स्वत: कामटे यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून सर्व अफवांचं खंडन केलं आहे. मी एकदम ठिकठाक आहे. जिवंत आहे, असं उल्हास कामटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सोशल मीडियावर उल्हास कामटेंना अटॅक आल्याचा आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कामटे आजारी असल्याचं दिसत आहेत. त्यांना रुग्णालयात नेलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली. तसेच कामटे गेल्याची अफवा हातोहात पसरली. लोकांनी त्यावर पोस्ट करणंही सुरू केलं.

Loading...

मी जिवंत आहे…

मात्र, उल्हास कामटे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून सर्व अफवा खोट्या ठरवल्या आहेत. मी जिवंत आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच व्हायरल होणारा व्हिडीओ कधीचा आहे आणि त्यामुळे अफवा कशी पसरली याची माहितीही त्यांनी दिली आहे. कामटे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात पाच लोक दिसत आहेत. त्या दिवशी काय झालं हे ते पाच लोक सांगत आहेत. झाड-फूंक या सिनेमाच्या प्रीमियर शोच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर कामटेंना एंग्झायटी अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना कोकिला बेन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळाने त्यांना डिस्चार्जही करण्यात आलं होतं, अशी माहितीच कामटे यांनी या व्हिडिओत दिली आहे.

 

अन् अचानक बेशुद्ध पडले

या व्हिडिओत झाडफूंकची टीमही आहे. त्यातील एका सदस्यानेही कामटे ठणठणीत असल्याचं सांगतानाच व्हिडिओची सत्यकथा मांडली आहे. त्या दिवशी झाडफूंकाच प्रीमियर होता. आम्ही दादांना प्रीमियरला यायची विनंती केली होती. हॉरर सिनेमा असल्याने दादांनी आधी पाहायला नकार दिला. पण माझ्या विनंतीमुळे ते आला. पण सिनेमातील एक सीन पाहताना त्यांना एंग्झायटी अटॅक आला. ते बेशुद्ध पडले. त्यामुळे आम्ही घाबरलो. एकच धावपळ उडाली. गोंधळ झाला. त्यामुळे आमच्या टीमने लगेचच दादांना रुग्णालयात नेलं. त्यात आमच्या सिनेमाचे डायरेक्टर राजन शर्माही होते. दादांना रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांना चेकअप करण्यात आलं. काही तासानंतर ते बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून दादा गेल्याच्या अफवा सुरु झाल्या आहेत. मात्र, असं काही नाही. दादा जिवंत आहे आणि ठणठणीत आहे, असं या सदस्याने सांगितलं.

 

मनापासून आभार

उल्हास कामटे यांनी हा व्हिडिओ शेअर करून अजून मी जिवंत आहे आणि ही बातमी गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. मी एकदम फिट आहे. नॉर्मल आहे. तुम्ही मला जे प्रेम दिलं आणि माझ्याविषयी एवढा विचार केला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us