UP पोलिसांचं Elon Musk ला सडेतोड उत्तर…वाह भाई कमाल होगया!

या ट्विटला जगभरातून लोक प्रतिसाद देत आहेत, मात्र या सगळ्याच्या दरम्यान यूपी पोलिसांच्या एका ट्विटवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

UP पोलिसांचं Elon Musk ला सडेतोड उत्तर...वाह भाई कमाल होगया!
UP police to elon musk
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 27, 2022 | 5:55 PM

आज सोशल मीडियाच्या दुनियेत एलन मस्कला कोण ओळखत नाही? तो माहित नसलेला क्वचितच कोणी असेल. दरम्यान, ते ट्विटरचे नवे बॉस झाल्यापासून त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे, दरम्यान, त्यांच्या एका ट्विटवर यूपी पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून असे उत्तर देण्यात आले की ते व्हायरल झाले.

खरंतर एलन मस्क यांनी एक ट्विट केलं तेव्हा हा सगळा प्रकार घडला. या ट्वीटमध्ये त्यांनी “ट्विट करणं हे एक काम म्हणून गृहीत धरलं जाईल का?” असा प्रश्न विचारला होता.

या ट्विटला जगभरातून लोक प्रतिसाद देत आहेत, मात्र या सगळ्याच्या दरम्यान यूपी पोलिसांच्या एका ट्विटवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

यावर उत्तर देताना यूपी पोलिसांच्या ट्विटर हँडलने लिहिले की, जर यूपी पोलिसांनी तुमची समस्या सोडवली तर ती काम म्हणून गणली जाते.

यानंतर यूपी पोलिसांनी हॅशटॅग टाकून युपीपी ही ट्विटर सेवा लिहिली आणि एलन मस्क यांनाही टॅग केलं. त्यांनी हे लिहिताच ट्विटरवर गोंधळ उडाला आणि युझर्स चांगलेच खुश झाले.

हे ट्विट व्हायरल होताच लोकांनी भरभरून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका यूजरने याचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, यूपी पोलिस आता आंतरराष्ट्रीय झाले आहे. मात्र, यूपी पोलिसांच्या या ट्विटवर एलन मस्क यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.