
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडीओ समाजातील सत्य स्थिती तुमच्या समोर मांडतात. अशात एक ३१ सेकंदाचा एक व्हिडीओ तुमच्या पर्सनालिटी संदर्भात दावा करतो. हा व्हिडीओ पाहून लोक त्यात स्वत:ला फिट बसवत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. अनेक युजरनी आपल्या मोबाईल क्रमांकासंबंधीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
हा व्हिडीओ कारच्या आत शुट केलेला आहे. समोर रस्ता आणि ट्रॅफीक सुरु आहे. त्यावर अक्षरे येतात की ‘5 वर्षे एकच मोबाईल क्रमांक 5 फॅक्ट’ बॅकग्राऊंडला येणारा व्हॉईस म्हणतो की जर तुम्ही गेल्या पाच वर्षांपासून एक नंबर वापरत असला तर तुमच्या संदर्भातील 5 गोष्टी तुम्हाला सांगतो.
या आहेत 5 पर्सनालिटी फॅक्ट्स (5 saal same mobile number)
1. तुमच्यावर कोणतीही कोर्ट वा पोलिस केस नाहीए
2. तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुमच्या पार्टनरच्या प्रति इमानदार आहात
3. तुमच्यावर कोणते कर्ज किंवा उधारी नाहीए..
4. तुम्ही लफडेबाज नाहीत आणि समाजात तुमची चांगली इमेज आहे.
5. तुम्ही जबाबदार आणि विश्वासार्ह व्यक्ती आहात.
लोकांनी या बाबी इतक्या रिलेटेबल वाटल्या की कमेंट सेक्शनमध्ये लोक आपल्या मोबाईलची हिस्ट्री सांगू लागले. हा व्हिडीओ एक्सवर @aksh_44 यांनी पोस्ट केला होता. आता पर्यंत या व्हिडीओला 1.8 लाखाहून अधिकवेळा पाहिले गेले आहे. तर 37 हजार लाईक्स मिळालेले आहेत. एका युजरने लिहीलेय की,’15 वर्षांपासून एकच नंबर आहे, वडीलांनी 12th मध्ये दिला होता.’ दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की माझ्याकडे 21 वर्षांपासून आहे कधीच नाही बदलला’. कोणी 10 वर्षे सांगितले, तर कोणी 15 वर्षे. लोकांच्या मोबाईल नंबर संदर्भातील स्टोरीज नॉस्टॅल्जिक डायरीहून कमी नव्हत्या. तुम्हाला वाटते का एक नंबर व्यक्तीचा सवयी आणि जबाबदारी दाखवू शकतो ? की हे सोशल मीडियावरील एक मजेदार लॉजिक आहे ? तुम्ही किती वर्षे एकच मोबाईल क्रमांक वापरत आहात ?
येथे पहा व्हिडीओ –
5 साल एक ही मोबाइल नंबर
5 FACT..!!🚫 pic.twitter.com/eXHbilMTLz
— l ꙰अक्ष 🦋 (@aksh__44) April 20, 2025