
कतार एअरवेजने प्रवास करणाऱ्या शाकाहारी प्रवासी डॉ.अशोका जयवीरा यांनी शाकाहारी जेवण मागवले होते. त्यांना त्यानंतर चुकून मांसाहारी जेवण देण्यात आले होते. फ्लाईट अटेंडेन्टने त्यानंतर ग्रेव्ही खाण्याचा सल्ला देला होता. मांस खाल्ल्याने त्यांना गुदमरल्यासारखे वाटले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलाने या प्रकरणात कतार एअरव्हेजवर खटला गुदरला आहे आणि नुकसान भरपाई देखील मागितली आहे.
८५ वर्षीय शाकाहारी प्रवासी डॉ. अशोका जयवीरा हे कतार एअरवेजने लॉस एंजिल्स ते कोलंबो असा प्रवास करत असतानात त्यांनी शाकाहारी जेवण मागवले होते, त्यांना त्यावेळी मांसाहारी जेवण पुरवण्यात आले.त्यांनी या संदर्भात तक्रार करताच त्यांना ग्रेव्ही वेगळी करुन खाण्याचा सल्ला दिला गेला. त्यामुळे त्यांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला होता. ३० जून २०२३ रोजी ही घटना घडली होती. लॉस एजिल्स ते कोलंबो अशा १५.५ तासांच्या प्रवासात ही घटना घडली होती. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले.
डॉ.जयवीरा यांनी शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. परंतू फ्लाईट अटेंडेंटने त्यांना सांगितले की असे कोणतेही भोजन उपलब्ध नाही. त्यांना मांसाहारी भोजनच देण्यात आले. मांस हटवून खाण्याच्या सल्ला त्यांना दिला. परंतू मनाविरुद्ध असा प्रकार करताना त्यांचा श्वास कोंडू लागला. त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. फ्लाईट क्रूने मदत करण्याचा प्रयत्न केला. विमान हजारो फूट उंचीवर असताना दूरस्थ आरोग्य सल्लागाराशी संपर्क केला गेला. परंतू जयवीरा यांचा प्रकृती ढासळतच गेली.
अखेर आपातकालिन स्थितीपासून हे विमान एडीनबर्ग, स्कॉटलँडमध्ये उतरवले गेले, नंतर डॉ. जयवीरा यांना रुग्णालयात नेण्यात आले. 3 ऑगस्ट, 2023 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण एस्पिरेशन निमोनिया सांगण्यात आले. भोजन वा तरल पदार्थ फुप्फुसात गेल्याने होणारा हा गंभीर फुप्फुसाचा आजार आहे. त्यांचा मुलगा सुर्या जयवीरा यांनी कतार एअरवेजवर खटला दाखल केला आहे. ज्यात भोजन सेवा आणि आपत्कालिन उपचारात हलगर्जी दाखवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
या खटल्यात $128,821 नुसार भरपाई मागितली आहे. हलगर्जीने मृत्यूस जबाबदार प्रकरणातील किमान वैधानिक रक्कम आहे.या खटल्यात मॉन्ट्रियल कन्व्हेन्शनचा तरतूद आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अपघातांमुळे झालेल्या दुखापती किंवा मृत्यूसाठी कठोर दंडाची तरतूद आहे. कन्व्हेन्शनमध्ये जास्तीत जास्त $175,000 भरपाईची तरतूद आहे.