असं वाटतं समोर भिंत आहे म्हणून हा पक्षी थांबलाय, पण… आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला जबरदस्त व्हिडीओ

ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतात. अनेक व्हिडिओ लोकांनाही बरंच काही शिकवत असतात.

असं वाटतं समोर भिंत आहे म्हणून हा पक्षी थांबलाय, पण... आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला जबरदस्त व्हिडीओ
Bird viral video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 5:11 PM

आनंद महिंद्रा देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती. त्यांची कीर्ती जगभर आहे. आनंद महिंद्रा व्यवसायात खूप यशस्वी आहेत, तसेच त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या कामातून वेळ काढतात आणि सोशल मीडियाचाही भरपूर वापर करतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतात. अनेक व्हिडिओ लोकांनाही बरंच काही शिकवत असतात. आजकाल त्यांचा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी हवेत फडफडणाऱ्या पक्ष्याची क्लिप शेअर केलीये.

एक पक्षी हवेत एकाच ठिकाणी विश्रांती घेत आपले पंख फडफडवत आहे. तो एक इंचही हलत नाही, पण त्याचे पंख वेगाने फडफडत आहेत.

त्याने स्वत: ला पूर्णपणे हवेत स्थिर ठेवले आहे. पाहताना असं वाटतं समोर अदृश्य भिंत आहे, त्यातून पुढे सरकता येत नाही. पण प्रत्यक्षात त्या पक्ष्याने आपल्या क्षमतेसह हवेत एकाच ठिकाणी स्वत:ला स्थिर केले आहे. हा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या पक्ष्याचा हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “निसर्ग आपल्या धडे देण्यात कधीही अपयशी ठरत नाही. अशांत काळाचा सामना तुम्ही कसा कराल? तुमचा व्यवसाय कोणताही असो, तुमचे पंख फडफडू द्या, तुमचे डोके स्थिर ठेवा, तुमचे मन स्वच्छ ठेवा आणि डोळ्यांना सतर्क ठेवा.”

31 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4.5 मिलियन वेळा पाहिला गेलाय. 16 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.