Maharashtra Local Body Election : सून जिंकली, सासू रुसली! नेत्यांच्या गणगोताचा निकाल, बघा राजकीय घराण्यातील जय-पराजय
यंदाच्या पालिका निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी घेतली. कोल्हापूर, नांदेडसह अनेक ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काही ठिकाणी त्यांना विजयाची चव चाखायला मिळाली. या निवडणुकीत राजकीय घराण्यांतील विजयापेक्षा पराभवाची संख्या अधिक दिसून आली.
यंदाच्या पालिका निवडणुकीत नेत्यांच्या घरातच तिकीटं देण्याचा एक नवा ट्रेंड दिसला. या निवडणुकांमध्ये अनेक राजकीय घराण्यांतील सदस्य नशीब आजमावत होते, ज्यात विजय आणि पराजय दोन्ही पाहायला मिळाले. नांदेडच्या लोह्यात भाजपने एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांना तिकीट दिले, परंतु मतदारांनी या सर्वांना पराभूत केले. कोल्हापूरच्या हातकणंगलेत आमदार अशोकराव मानेंच्या कुटुंबातील तिन्ही उमेदवार हरले. तर बदलापुरात शिंदे सेनेचे वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहापैकी तीन जण विजयी, तर तीन पराभूत झाले. फलटणमध्ये रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे निंबाळकर यांचा पराभव झाला. परभणीच्या पाथरीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगाही पराभूत झाला. याउलट, सोलापूरच्या करमाळ्यात भाऊ, भावजय आणि बहीण अशा तिघांचा विजय झाला. बीडच्या गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भावजय गीता पवार नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या कन्या विजयी झाल्या, तर संगमनेरात बाळासाहेब थोरातांच्या भाचीसून मैथिली तांबे नगराध्यक्ष बनल्या. या निवडणुकीने राजकीय घराण्यांतील समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा

