BJP Maharashtra : उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन अन् भाजपमध्ये अंतर्गत वाद
महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये नव्याने होणाऱ्या पक्षप्रवेशांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पुणे, नाशिक, पालघरसह अनेक ठिकाणी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी या उपऱ्यांच्या प्रवेशाविरोधात आंदोलने केली आहेत. अमोल देवळेकर यांच्या प्रवेशावरून पुण्यात झालेल्या विरोधाने हे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांच्या प्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेषतः पुणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या अमोल देवळेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सरकारच्या मांसबंदीच्या आवाहनाला विरोध करत देवळेकर यांनी मांस वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. अशा व्यक्तीला पक्षात घेतल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आंदोलन छेडले. फक्त पुणेच नाही, तर नाशिकमध्येही अशीच परिस्थिती आहे. एकेकाळी दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपने केला होता, आता त्याच बडगुजर यांच्यासोबत काम करावे लागण्याच्या स्थितीत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पालघर हत्याकांडावरून भाजप ज्यांच्यावर टीका करत होती, त्याच व्यक्तीला पक्षात प्रवेश दिल्याने वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे भाजपने तो प्रवेश रद्द केला. भाजप नेते विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून लोक पक्षात येत असल्याचा दावा करत असले तरी, या पक्षप्रवेशांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कुचंबणा होत आहे.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष

