VIDEO : विमानतळाला बनवला पिकनीक स्पॉट! भारतीय पर्यटकांचा तो व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले
काही भारतीय नागरिक परदेशात व्हिएतनामला फिरायला गेले होते. पण त्यांनी एअरपोर्टच्या वेटिंग रूम अस काही केलंय, की भारतीयांनीच त्यांच्यावर टिका केल्या आहे. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.

भारतापेक्षा परदेशात शिस्तीला आणि स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भारतातून गेलेला नागरिक तिथली स्वच्छता आणि शिस्त पाहून हूरळून जातो. पण व्हिएतनाममधील एका विमानतळावर भारतीय पर्यटकांनी जे केल,ते पाहून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय लोकांनी चक्क जमिनीवर बसून तिथेच पंगत मांडली. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या वागण्यावर टीका केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये साधारण 15 ते 20 भारतीय पर्यटक व्हिएतनाममधील एका विमानतळाच्या वेटिंग रूममध्ये जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत. त्यांनी जमिनीवर पेपर पसरवला आहे आणि त्यावर जेवणाची ताटं ठेवली आहेत. विशेष म्हणजे आजूबाजूला काही रिकाम्या खुर्च्याही दिसत आहेत. ते भारतीय लोक परदेशात भारतीय पगंत मांडून आनंदाने जेवताना दिसत आहे.
या व्हिडिओला, व्हिएतनाम विमानतळावर भारतीय पद्धतीचं जेवणं असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
उद्याोगपती हर्ष गोएंका यांनीदेखील हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. व्हिएतनाम हे भारतीय पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ बनत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरावर टिका केली आहे. विमानतळाला पिकनिक स्पॉट समजून तिथे अन्न पसरवणं आणि अस्वच्छता करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं . परदेशात फिरताना भारतीयांनी सार्वजनिक ठिकाणाच्या स्वच्छतेचे आणि शिस्तीचे भान कधी ठेवणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
व्हिडिओ पाहून भारतीयांनीच केल्या भारतीयांवर टिका
हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी पर्यटकांच्या वागण्यावर टीका केली. काहींनी अशा प्रकारांमुळे परदेशात भारतीय लोकांची इमेज खराब होत असल्याचं म्हटलं. तर एका यूजरने अशा लोकांचे पासपोर्ट रद्द करण्याचीही मागणी केली. काही लोकांनी सिंगापूरचे उदाहरण दिले, तिथे कडक नियम आणि नियम तोडल्यास भरपूर दंड असल्याने भारतीय लोक तिथे असं काही करत नाही असं म्हटलं आहे.