विमानतळावरील बेवारस बॅग घेऊन आली, उघडताच आढळली ती गोष्ट… सांगूही शकत नाही…

विमानतळावर बेवारस पडलेली बॅग एका महिलेने उचलली. तिने ती घरी आणली आणि आत काय आहे ते पाहू लागली. मात्र तिने जसजशा वस्तू बाहेर काढण्यास सुरूवात केली, आतमध्ये अशा काही गोष्टी होत्या की आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले...

विमानतळावरील बेवारस बॅग घेऊन आली, उघडताच आढळली ती गोष्ट... सांगूही शकत नाही...
| Updated on: Feb 14, 2025 | 2:58 PM

रस्त्यावरच्या कोणत्याही अनोळखी वस्तूला हात लावू नये, ती उचलून नये असे आपल्याला नेहमीच सांगितलं जातं. त्यामध्ये काहीही असू शकतं, अशी एखादी गोष्ट असू शकते जी जीवासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, परदेशात अजूनही काही लोकं थोडे पैसे देऊन विमानतळावर अशी बॅग खरेदी करतात ज्यांचा कोणीही मालक नाही. एका महिलेनेही असेच काही केले आणि तिचे नशीब आजमावायचे ठरवलं. पण बॅग घरी आणल्यानंतर आतमध्ये अशा काही गोष्टी आढळल्या की महिला चक्रावून गेली.

त्या महिलेने विमानतळावर बेवारस पडलेली बॅग उचलली, आणि घरी आणली. त्या बॅगेत काय- काय आहे ते पाहू लागली. मात्र तिने जसजशा वस्तू बाहेर काढण्यास सुरूवात केली, आतमध्ये अशा काही गोष्टी होत्या की आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. एवढ्याशा पैशात ती जी बॅग घेऊन आली ती इतकी मौल्यवान निघेल, अशी स्वत: स्त्रीलाही अपेक्षा नव्हती.

बेवारस बॅगेनं चमकलं नशीब

मिररच्या रिपोर्टनुसार, बेकी नावाच्या महिलेने नुकतीच विमानतळावर £129 म्हणजेच 14 हजार रुपयांना बेवारस बॅग विकत घेतली. बेकीने ही जड बॅग घरी आणली आणि पॅकिंग ओपन केलं. रोझ गोल्ड कलरच्या ही बॅग उघडताच तिचं नशीबही चमकलं. त्यामध्ये कामची हरएक वस्तू उपलब्ध होती. डिझायनर शूज आणि चप्पल याशिवाय लक्झरी ब्रँडचे हेअर स्ट्रेटनर आणि मुलांचे ब्रँडेड शूजही होते. ॲपलचा एक व्हाईट आयपॅड आणि शीन ब्रँडचे अनेक सुंदर कपडे तसेच पोकेमॉन कार्ड्सचा बॉक्स देखील त्यात होता.

या बॅगेत अनेक मौल्यवान वस्तू आढळल्या. पण त्यात चप्पलही आढळली. त्यामुळे मला चप्पल सापडली असं ती सांगूही शकत नव्हती.

 

हिला तर लॉटरी लागली

बेकीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यावर लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले – हे आश्चर्यकारक आहे. तर ही खूप चांगली डील होती, असं दुसऱ्याने लिहीलं. मात्र काही युजर्सनी वेगळ्याही कमेंट्स केल्या. ही बॅग खरी ज्यांच्या मालकीची असेल त्यांचे काय हाल झाले असतील विचार करा ना. मात्र, बेकीने तिच्या व्हिडिओसोबत एक पोस्टही लिहीली आहे. हे सामान ज्याचं असेल त्याने जरूर भेटावं, असं आवाहन तिने केलं. मात्र सध्या तरी या नव्या आणि ब्रँडेड वस्तू तिच्याच आहेत कारण तिला त्या तिच्या नशीबाने मिळाल्यात.