ViraL: चक्क बाइकला ट्रॅक्टरचे टायर! इंजिनिअरचा मोठा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

ViraL: एका कंटेंट क्रिएटरने आपल्या अनोख्या प्रयोगाने नेटिझन्सना चकीत केले आहे. त्याने आपल्या हिरो स्प्लेंडर बाइकच्या दोन्ही चाकांच्या जागी चक्क ट्रॅक्टरचे टायर बसवले आहेत.

ViraL: चक्क बाइकला ट्रॅक्टरचे टायर! इंजिनिअरचा मोठा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Viral
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 29, 2025 | 3:33 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. कधीकधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टींवर विश्वासही बसत नाही. असाच एका इजिनिअरचा जुगाड पाहून नेटकरी चकित झाले आहेत. विशेषतः जेव्हा देसी जुगाडाची (Desi Jugaad) बातमी असते तेव्हा सर्वजण आवर्जुन पाहतात. कारण या बाबतीत आपल्या भारतीयांचा मेंदू ज्या पद्धतीने चालतो, त्याची काही मर्यादा नसते. ‘देसी इंजिनिअरिंग’चा असाच एक नमुना सध्या इंटरनेटच्या जगात खूप धुमाकूळ घालत आहे.

कोणी केलाय हा जुगाड?

बिहारचा रहिवासी राजू कुमार नावाचा एक कंटेंट क्रिएटरने आपल्या अनोख्या प्रयोगाने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने @golamit_yt हँडलवरून इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो आपल्या हिरो स्प्लेंडर बाइकच्या दोन्ही चाकांच्या जागी ट्रॅक्टरचे टायर बसवून रस्त्यावर गाडी फिरवताना दिसत आहे.

वाचा: फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI निघाला चालाख! शरण येण्यापूर्वी केले मोठे काम, नेमकं काय केलं?

ट्रॅक्टरचे पुढचे टायर बाइकला ज्या चतुराईने जोडले गेले आहे, ते पाहून लोक थक्क झाले आहेत. व्हिडीओत राजूला आपल्या विचित्र मॉडिफाइड बाइकला रस्त्यावर मजेत फिरवताना सर्वजण पाहत आहेत. सुरुवातीला पाहताना वाटेल की ही बाइक कदाचित चालणारही नाही. पण नंतर अशी इतक्या वेगाने धावली की तुम्हीही पाहत राहाल. एकूणच, सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा स्टंट पाहता-पाहता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा देसी जुगाड व्हिडीओ लोकांना इतका आवडतो आहे की ते फक्त पाहतच राहत आहेत. याशिवाय कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रियांचा पूरच आला आहे. एका युजरने कमेंट केले की, भाई बाइकचे टायर काय सायकलमध्ये फिट करून टाकले. दुसरा म्हणाला की, ही तर मॉन्स्टर बाइक बनली गुरू. आणखी एका युजरने म्हटले की, एकदम गर्दा उडवून दिला. मात्र, काही युजर्सनी या जुगाडाच्या यशस्वीपणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने टिप्पणी केली, हे काही जास्तच नाही का भाई. असे केले तर ना बाइक नीट राहील, ना ट्रॅक्टर. दुसऱ्याने म्हटले की, जुगाड तर ठीक आहे, पण मला वाटत नाही की स्प्लेंडर त्याचा भार सहन करू शकेल.